Onion Farming : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी नवनवीन वाणाची निर्मिती केली आहे. विविध सुधारित वाणाची निर्मिती करून शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पाडण्यासाठी विद्यापीठ कायमच प्रयत्न करत आले आहे. राहुरी कृषी विद्यापीठाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील कांद्याच्या विविध जाती विकसित केल्या आहेत.
खरंतर राज्यात कांदा लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. कांद्याची संपूर्ण राज्यात कमी अधिक प्रमाणात लागवड केली जाते. खरीप, लेट खरीप तसेच रब्बी हंगामात महाराष्ट्रात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये रब्बी हंगामात कांदा लागवडीखालील क्षेत्र सर्वाधिक आहे.
हे पण वाचा :- कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ तारखेपर्यंत सुरू राहणार कापसाची खरेदी, तदनंतर….
रब्बीच्या तुलनेत खरीप हंगामामध्ये कांदा लागवडीचे क्षेत्र कमी असले तरी देखील खरीपातही मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादित केला जातो. खरीप हंगामामध्ये राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या फुले समर्थ या वाणाची देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
आतापर्यंत या वाणाचे कांदा बियाणे शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाच्या खरेदी केंद्रावर उपलब्ध करून देण्यात येत होते. परंतु कृषी विद्यापीठाच्या खरेदी केंद्रावर जाताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
अहमदनगर व्यतिरिक्त इतरही जिल्ह्यात या वाणाची मोठ्या प्रमाणात शेती होते. अशा परिस्थितीत या वाणाच्या बियाण्याच्या खरेदीसाठी इतर जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना अधिकचा पैसा आणि वेळ खर्च करावा लागतो.
हे पण वाचा :- देव पावला ! 23 ते 29 जून दरम्यान ‘या’ सात जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस, तुमच्या जिल्ह्यात कसं राहणार हवामान? वाचा….
यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नासिक, अहमदनगर आणि सातारा जिल्ह्यात असलेल्या कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रावर आता फुले समर्थ या जातीच्या बियाण्याची उपलब्धता करून दिली जाणार आहे.
तसेच निफाड (जि. नाशिक)येथील कृषी संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) येथील कांदा व द्राक्ष संशोधन केंद्र, चास (जि. नगर) येथील कृषी संशोधन केंद्र, व बोरगावातील (जि. सातारा) कृषी संशोधन केंद्रात हे कांदा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. निश्चितच हा निर्णय राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा सिद्ध होणार आहे.