Onion Export News : केंद्र सरकारनं काल अर्थातच 27 एप्रिल 2024 ला एक मोठा निर्णय घेतला आहे. देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय खूपच महत्त्वाचा समजला जातोय. मिळालेल्या माहितीनुसार काल केंद्रातील सरकारने देशभरातील ९९,१५० टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारच्या माध्यमातून एक प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले आहे.
पण, केंद्राने खरंच नव्याने 99,150 टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे का? हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. कारण की निवडणुकीच्या काळात अचानक केलेल्या या घोषणेवर शेतकरी नेत्यांनी आक्षेप घेतला आहे.
शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून ही घोषणा जुनीच असल्याचं सांगितलं जात आहे. फक्त निवडणुकीच्या काळात केंद्रातील सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी आणि शेतकरी वोट बँक डोळ्यापुढे ठेवून ही घोषणा झाली असून हा एक निवडणूक जुमला असल्याचे बोलले जात आहे.
केंद्रानं आज कांदा निर्यात बंदी उठवल्याची जी घोषणा केली आहे. केंद्रानं यामध्ये ९९,१५० टन कांदा निर्यातीला परवागनी दिली असल्याचे म्हटले आहे. बांगलादेश, युएई, भूतान, बहारिन, मॉरिशन आणि श्रीलंका या देशांना कांदा निर्यात केली जाणार असे नमूद आहे.
पण कोणत्या देशाला किती कांदा निर्यात होणार याची यात माहिती नाही. शिवाय याबाबतचे फक्त एक प्रसिद्धी पत्रक निर्गमित झालेले आहे. अद्याप याची अधिसूचना ही विदेश व्यापार महासंचालनालयानं काढलेली नाही.
यामुळे हा एक निवडणूक जुमला असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीही कांदा निर्यातबंदी उठवल्याची अफवा पसरली गेली होती. आता या सहा देशांना कांदा निर्यातीस देण्यात आलेली परवानगी देखील एक अफवाच ठरणार असे बोलले जात आहे.
दुसरीकडे, काही कृषी विषयातील जाणकार लोकांच्या माध्यमातून आतापर्यंत ज्या वेगवेगळ्या देशांना कांदा निर्यात करण्यात आली आहे त्याची माहिती देणारे हे प्रसिद्ध पत्रक असल्याचे म्हटले गेले आहे.
यामुळे यावरून मोठा गदारोळ पाहायला मिळत आहे. यामुळे आता सरकारने नव्याने कांदा निर्यात करण्यास परवानगी दिलेली आहे की जुन्या परवानगी ची माहिती दिलेली आहे हे पाहणे विशेष खास ठरणार आहे.