Onion And Maize Rate : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या शेतीवर अवलंबून आहे. दरम्यान देशातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी समोर आली आहे.
खरे तर, सध्या आपल्या शेजारील राष्ट्रांमध्ये अर्थातच बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरता पाहायला मिळत आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडावा लागला आहे. तेथील लष्कराने आता सत्ता हाती घेतली असून लवकरच तेथे काळजीवाहू सरकार स्थापित होणार आहे.
पण, या साऱ्या घडामोडींमुळे आपल्या देशातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. देशातील कांदा आणि मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी बांगलादेश मधील राजकीय अस्थिरता सर्वात जास्त धोक्याची ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशात सुरू असणाऱ्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय कृषी मालाची होणारी निर्यात पूर्णपणे थांबवली गेली आहे. बांगलादेशमध्ये भारतातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याची आणि मक्याची निर्यात होत असते.
मात्र आता ही कृषी मालाची निर्यात थांबवली जाणार आहे. साहजिकच यामुळे कांदा आणि मक्याच्या बाजारभावावर विपरीत परिणाम होणार आहे. देशांतर्गत कांदा आणि मक्याची उपलब्धता वाढेल आणि यामुळे याचे बाजार भाव घसरतील अशी भीती व्यक्त होत आहे.
एका शासकीय आकडेवारीनुसार गेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारतातून निर्यात झालेल्या एकूण कांदा निर्यातीपैकी 20.3 टक्के कांदा हा एकट्या बांगलादेशात निर्यात झाला होता.
मात्र आता तेथील राजकीय अस्थिरतेमुळे निर्यात थांबणार आहे. परिणामी कांदा, मका यांसारख्या शेती पिकांचे भाव घसरणार आहेत. कारण की देशांतर्गत बाजार समित्यांमध्ये आता या कृषी मालाची आवक वाढणार आहे आणि याचे बाजार भाव घसरण्याची दाट शक्यता आहे.
कांदा हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्वाचे पीक आहे. देशाच्या एकूण कांदा उत्पादनापैकी 70 टक्के कांद्याचे उत्पादन महाराष्ट्रात होते. यामुळे कांदा बाजारभावात घसरण झाली तर याचा सर्वाधिक फटका आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे.
हेच कारण आहे की बांगलादेश मधील राजकीय परिस्थिती कधीपर्यंत सुरळीत होणार याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे देखील मोठे बारीक लक्ष राहणार आहे.