October Cotton Rate : महाराष्ट्रात कापूस या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. खानदेश, मराठवाडा आणि विदर्भात कापसाची शेती मोठ्या प्रमाणात होत असून राज्यातील विविध भागांमध्ये नव्या हंगामातील कापसाची आवक होऊ लागली आहे. मात्र अजूनही नव्या कापसाची आवक फारच कमी आहे.
ज्या शेतकऱ्यांनी कापसाची आगात लागवड केली होती त्या शेतकऱ्यांचा कापूस वेचणीसाठी तयार झाला असून अशाच शेतकऱ्यांचा कापूस सध्या बाजारात चमकत आहे. मात्र पुढील महिन्यात आवक वाढणार आहे. दरवर्षी नवरात्र उत्सवानंतर महाराष्ट्रात कापसाची आवक वाढत असते.
यंदाही नवरात्र उत्सवानंतर आवक वाढणार असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. सध्या बाजारात जो नवीन कापूस विक्रीसाठी येत आहे त्याला सव्वा सात हजार रुपये प्रति क्विंटल च्या आसपास दर मिळत आहे. अशा परिस्थितीत ऑक्टोबर मध्ये विशेषता विजयादशमीनंतर कापसाची आवक वाढल्यानंतर त्याला काय दर मिळणार? याबाबत जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे.
दरम्यान आज आपण ऑक्टोबर मध्ये कापूस बाजाराची स्थिती कशी राहणार? या संदर्भात जाणकार लोकांनी दिलेली माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाचे भाव किमान आधारभूत किमतीपेक्षा (MSP) जास्त आहेत.
मात्र आगामी काळात बाजार भाव कसे राहणार यावरच कापूस उत्पादकांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. दरम्यान गेल्या तीन वर्षाचा विचार केला असता गेल्या तीन वर्षात ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या काळात सात हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिकचा दर मिळाला आहे.
2021 मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कापसाला सात हजार 939 रुपये, 2022 मध्ये 8762 रुपये आणि 2023 मध्ये 775 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे. म्हणजे गेल्या वर्षी कापसाला सुरुवात कमी दर मिळाला आहे तर 2022 मध्ये सर्वात जास्त भाव मिळाला आहे.
दरम्यान 2024 च्या ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात कापसाला 7500 ते 8500 प्रतिक्विंटल या दरम्यान भाव मिळण्याची शक्यता जाणकार लोकांनी वर्तवली आहे. मात्र असे असले तरी प्रत्यक्षात या काळात बाजारात काय दर मिळणार यासाठी वेगवेगळे घटक कारणीभूत ठरणार आहेत.
यामुळे जर ऐनवेळी कापसाचे बाजार भाव ठरवणारे घटक बदललेत तर किमतीत देखील चढ-उतार होणार आहे, शेवटी हा एक अंदाज आहे. म्हणून यंदा कापसाला काय भाव मिळणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे राहणार आहे.