Non Ac Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची देशातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे. ही ट्रेन राज्यातील 51 महत्वाच्या मार्गांवर सुरू आहे. महाराष्ट्राला तब्बल आठ वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्या आहेत. राजधानी मुंबई येथूनचं सहा वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. तसेच उपराजधानी नागपूरला ही दोन ट्रेनची भेट मिळाली आहे.
राजधानी मुंबईहून सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते साईनगर शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या सहा मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरु आहे.
उपराजधानीबाबत बोलायचं झालं तर नागपूर ते बिलासपूर आणि नागपूर ते इंदोर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. विशेष बाब अशी की मुंबई आणि पुण्याला नजीकच्या काळात आणखी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहेत.
पुणे ते सिकंदराबाद आणि मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर लवकरच ही हाय स्पीड ट्रेन सुरू होणार अशी बातमी प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून समोर येत आहे. खरंतर वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करण्यास प्रवाशांकडून पसंती दाखवली जात आहे.
पण, या गाडीचे तिकीट तर पाहता अनेकजण ओरड करतात. ही गाडी फक्त उच्च वर्गीय लोकांसाठी बनवण्यात आली असल्याचा आरोप लोवर मिडल क्लास लोकांच्या माध्यमातून केला जातो.
दरम्यान लोवर मिडल क्लास नागरिकांची हीच अडचण लक्षात घेऊन रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेस चे नॉन एसी व्हर्जन लॉन्च केले आहे. नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस ला अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन असे नाव देण्यात आले आहे.
ही गाडी ताशी 130 किलोमीटर वेगाने धावण्यास सक्षम आहे. दरम्यान याच गाडी संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच बिहार ते राष्ट्रीय राजधानी दिल्ली दरम्यान ही गाडी चालवली जाणार आहे.
बिहारची राजधानी पटना ते दिल्ली या दरम्यान ही गाडी सुरू होणार आहे. ही गाडी फक्त बारा तासात या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास पूर्ण करणार आहे. पाटण्याहून दिल्लीला जाणाऱ्या अमृत भारत ट्रेनमध्ये एसी स्लीपर कोच नसेल आणि ही ट्रेन पूर्णपणे अनारक्षित राहणार आहे.
या ट्रेनचा रंग केशरी आणि राखाडी असेल. यात 8 सामान्य कोचं आणि 12 द्वितीय श्रेणीचे डबे असतील. वंदे भारत गाड्यांप्रमाणेच देशात अमृत भारत गाड्यांचे जाळे विणले जात असल्याची माहिती आहे.
याचाच एक भाग म्हणून भारतीय रेल्वेने 2024-25 मध्ये अमृत भारत एक्सप्रेससाठी 2,605 सामान्य डबे आणि 1,470 स्लीपर कोच तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. प्रवाशांची वाढती मागणी आणि सुविधा लक्षात घेऊन रेल्वे या दिशेने पावले उचलत आहे.