Nitin Gadkari News : गेल्या महिन्यात महाराष्ट्रात दोन वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात आल्यात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी अशा या दोन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालू झाल्यात. प्रवाशांचा या ट्रेनला मोठा प्रतिसादही लाभत आहे. अशातच आता वंदे भारत संदर्भात एक मोठी माहिती येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात येत्या काही दिवसात वंदे मेट्रो धावणार आहे. वास्तविक पाहता नितीन गडकरी यांनी विदर्भातील छोटे शहरे रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी ब्रॉडगेज मेट्रोची संकल्पना मांडली होती. मात्र केंद्र सरकारने ब्रॉडगेज मेट्रोला परवानगी नाकारली.
हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! ‘या’ बँकेत सुरु झाली मोठी पदभरती; ‘हे’ उमेदवार करू शकतात अर्ज, वाचा सविस्तर
मात्र आता ही विदर्भातील शहरे जोडण्यासाठी लवकरच वंदे मेट्रो सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे. ब्रॉड गेज मेट्रोच्या धरतीवरच वंदे मेट्रो उभारली जाणार असून केंद्र शासनाने ही संकल्पना मांडली आहे. वास्तविक गडकरी यांनी नागपूर जवळील शंभर ते दीडशे किलोमीटर अंतरावरील शहरांना नागपूरशी जोडण्यासाठी ब्रॉडगेज मेट्रो संकल्पना मांडली होती.
मात्र ती केंद्र शासनाने नाकारत आता त्याच धर्तीवर वंदे मेट्रोची नवीन संकल्पना पुढे आणली आहे. ही वंदे मेट्रो वंदे भारत ट्रेन प्रमाणेच राहणार असून वंदे भारत एक्सप्रेसची ही छोटी आवृत्ती म्हणून ओळखले जाणार आहे.
हे पण वाचा :- Mhada : आनंदाची बातमी ! म्हाडाच्या घरासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय; नागरिकांचा होणार असा फायदा
केंद्रीय रेल्वेमंत्री त्यांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2023 पर्यंत या वंदे मेट्रोची डिझाईन तयार होणार आहे. निश्चितच नितीन गडकरींचा मास्टर प्लॅन आता वेगळे स्वरूप घेऊ पाहत आहे. त्यांनी सांगितलेली ब्रॉडगेज मेट्रोची संकल्पना जरी सत्यात उतरत नसल्याचे चित्र असले तरी देखील वंदे मेट्रो साठी केंद्र शासनाकडून प्रयत्न सुरू असून रेल्वे विभागाने मांडलेली ही संकल्पना निश्चितच प्रवाशांसाठी फायदेशीर राहणार आहे.
खरं पाहता वंदे भारत एक्सप्रेस ला ज्या पद्धतीने प्रवाशांचा प्रतिसाद लाभत आहे तसाच प्रतिसाद वंदे मेट्रोला देखील लाभेल असा विश्वास केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर वर्तवला होता.
हे पण वाचा :- महाराष्ट्रातील गरीब कुटुंबाला 100 रुपयात रवा, डाळ, साखर, तेल आनंदाचा शिधा मिळणार; पण नेमका लाभ कुणाला? वाचा सविस्तर