New Vande Bharat Train News : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत एक्सप्रेस बाबत एक मोठी माहिती दिली आहे. खरं पाहता गेल्या काही महिन्यांपासून वंदे भारत एक्सप्रेसच्या चर्चा राज्यासह संपूर्ण देशात रंगत आहेत. जलद गती आणि आरामदायी प्रवास यामुळे ही ट्रेन अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली आहे. विशेष म्हणजे या ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधा या एवढ्या अत्याधुनिक आहेत की या ट्रेनचे अधिक भाडे असतानाही प्रवासी या ट्रेननेच प्रवास करण्यास उत्सुक आहेत.
सध्या स्थितीला देशभरात एकूण दहा वंदे भारत ट्रेन सुरू असून लवकरच देशाला अकरावी वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. याबाबतची माहिती रेल्वेमंत्री वैष्णव यांनी स्वतः दिली आहे. अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात जयपूर ते दिल्ली या रूटवर अकरावी वंदे भारत गाडी धावणार आहे.
हे पण वाचा :- मुंबईवासियांसाठी महत्वाची बातमी! कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ‘या’ महिन्यात होणार सुरु; ‘या’ रेल्वे स्थानकावर थांबणार, पहा…..
राजस्थानची राजधानी जयपूर हे एक मोठे पर्यटन स्थळ आहे. पिंक सिटी म्हणून या शहराची संपूर्ण जगात ख्याती आहे. या शहरातून मोठ्या प्रमाणात दिल्लीमध्ये प्रवासी प्रवास करतात. दिल्ली ही देशाची राजधानी आणि जगात ख्याती प्राप्त असं एक पर्यटन स्थळ आहे. परिणामी या दोन्ही शहरां दरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करत असतात.
अशा परिस्थितीत या रूटवर वंदे भारत ट्रेन सुरू व्हावी ही प्रवाशांची गेल्या अनेक दिवसांपासून ची मागणी होती. याच पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या माध्यमातून या रूटवर ट्रेन सुरू करण्याचे नियोजन आखण्यात आल आहे. उत्तर पश्चिम रेल्वे विभाग जयपूर ते दिल्ली दरम्यान ही गाडी सुरू करणार असून यामुळे आता या दोन्ही महत्त्वाच्या शहरादरम्यान प्रवास सोयीचा होणार आहे.
हे पण वाचा :- अहमदनगर, नाशिक, पुणे, अहमदनगर, संभाजीनगर जिल्ह्यात आजही पाऊस पडणार का? कसं राहणार महाराष्ट्राचं हवामान, पहा
19 मार्च 2023 रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव जयपूर येथे आले असता त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. मंत्री महोदय यांनी दिलेल्या माहितीनुसार 24 मार्च 2023 रोजी जयपूर येथे वंदे भारत ट्रेन पोहोचणार आहे. त्यानंतर या ट्रेनचे लोकार्पण एप्रिल महिन्यातील पहिल्या आठवड्यात करण्याचा मानस शासनाचा आहे.
याच पार्श्वभूमीवर अश्विनी वैष्णव यांनी जयपुर रेल्वे स्टेशनचा दौरा केला आहे. विशेष म्हणजे दिल्लीहून जयपुर दरम्यान अश्विनी वैष्णव यांनी शताब्दी एक्सप्रेसने प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी शताब्दी एक्सप्रेस मध्ये असलेल्या प्रवाशांसोबत वार्तालाप देखील केला आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियामध्ये वेगाने व्हायरल होत आहे.
हे पण वाचा :- पुणे जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांच्या ‘इतक्या’ रिक्त जागांसाठी भरती सुरू; ऑफलाइन पद्धतीने ‘या’ ठिकाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन