New Vande Bharat Train : पुढल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये लोकसभा निवडणुका सुरू होणार आहेत. तसेच काही प्रमुख राज्यात विधानसभा निवडणुका देखील राहणार आहेत. आपल्या महाराष्ट्रात देखील पुढील वर्षी विधानसभा निवडणुका असतील. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून वेगवेगळी विकासाची कामे जलद गतीने पूर्ण केली जात आहेत.
यामध्ये देशातील वेगवेगळ्या रेल्वे मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू केल्या जात आहेत. आतापर्यंत देशातील एकूण 16 मार्गांवर ही ट्रेन सुरू झाली आहे. यापैकी या चालू महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये पाच वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या आहेत. दरम्यान, येत्या मे महिन्यात देखील वेगवेगळ्या मार्गांवर ही गाडी चालवण्याचे नियोजन आहे. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे.
हे पण वाचा :- मुंबईमधील मेट्रो प्रवाशांसाठी महत्वाची बातमी; आता अंधेरी ते बीकेसी प्रवास होणार सुसाट, पहा सविस्तर
पश्चिम बंगालमधील हावडा ते भगवान श्रीकृष्ण परमधाम जगन्नाथ पुरी दरम्यान ही गाडी सुरु होणार आहे. या सेमी हाय स्पीड गाडीला आता पुढील महिन्यात म्हणजेच मे महिन्यात हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. यामुळे निश्चितच भगवान श्रीकृष्ण यांच्या परमधामला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पश्चिम बंगालमधील लाखो कृष्ण भक्तांसाठी भारतीय रेल्वेचा हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे. भगवान श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी जगन्नाथ पुरी या तीर्थक्षेत्रावर देशविदेशातून लोक येतात. लाखोच्या संख्येने भाविक या तीर्थक्षेत्राला भेटी देतात. अशा परिस्थितीत भारतीय रेल्वेने पश्चिम बंगालमधील तसेच देशभरातून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी आणि पर्यटकांसाठी ही गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान आता या मार्गावर सुरू होणाऱ्या या गाडीचे ट्रायल रन घेण्यास सुरुवात झाली आहे. या मार्गावर एकूण दोन ट्रायल रन घेतले जाणार असून यापैकी एक ट्रायल रन आज सकाळीच पूर्ण झाला आहे. आता दुसरा ट्रायल रन 30 एप्रिल 2023 रोजी घेतला जाणार आहे. ट्रायल रन यशस्वी झाल्यानंतर ही गाडी सुरू केली जाणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.
मात्र काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये हावडा ते जगन्नाथ पुरी दरम्यान सुरू होणारी ही वंदे भारत एक्सप्रेस मे महिन्यातील दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सुरू केली जाऊ शकते असा दावा करण्यात आला आहे. याबाबत मात्र रेल्वे कडून कोणतच अधिकारीक असं वक्तव्य समोर आलेलं नाही. पण लवकरच रेल्वे याबाबत माहिती देणार आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी खुशखबर ! ‘हा’ महत्त्वाचा रेल्वे मार्ग डिसेंबर महिन्यात होणार सुरू, वाचा सविस्तर