New Vande Bharat Express List : गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण देशात वंदे भारत एक्सप्रेस बाबत वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. कधी या गाडीच्या टॉप क्लास सुविधांबाबत चर्चा होते तर कधी या गाडीच्या अधिक तिकीट दराबाबत. वास्तविक, ही गाडी सुरू झाल्यानंतर या गाडीला रेल्वे प्रवाशांनी अक्षरशा डोक्यावर घेतले आहे.
या गाडीने प्रवास करणे अनेकांना आवडत आहे. या गाडीमुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास खूपच गतिमान झाला आहे. हेच कारण आहे की देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला सुरू करण्याचे नियोजन भारतीय रेल्वेने आखले आहे. आतापर्यंत देशातील एकूण 25 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे आगामी काही महिन्यात आणखी काही महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला सुरू केले जाणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आगामी काही महिन्यात देशातील नऊ महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार आहे. वास्तविक पुढल्या वर्षी अर्थातच 2024 मध्ये देशात लोकसभा निवडणूका आणि काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
आपल्या महाराष्ट्रात देखील विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. यासह राजस्थान आणि मध्य प्रदेश मध्ये देखील विधानसभा निवडणूकांचा थरार रंगणार आहे. हेच कारण आहे की, आता केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना खुश करण्यासाठी देशातील काही महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला सुरू केले जाणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, चेन्नई स्थित इंटिग्रल कोच फॅक्टरी मध्ये या नऊ गाड्या तयार करण्यात आल्या आहेत. आता लवकरच या 9 वंदे भारत एक्सप्रेस वेगवेगळ्या मार्गावर सुरू केल्या जाणार आहेत.
इंदूर ते जयपूर दरम्यान, जयपूर ते उदयपूर दरम्यान, जयपूर ते चंदीगड दरम्यान, पुरी ते रुरकेला दरम्यान आणि पटना ते हावडा दरम्यान आगामी काही महिन्यात वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या जाणार आहेत. दरम्यान उर्वरित चार मार्गांची माहिती अद्याप भारतीय रेल्वे कडून देण्यात आलेली नाही. मात्र लवकरच या चार मार्गांची देखील माहिती समोर येणार आहे.