New Vande Bharat Express Inauguration : आगामी वर्षात लोकसभा निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या माध्यमातून विकासाची कामे जलद गतीने करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन वेगवेगळ्या राज्यांना केंद्र शासनाच्या माध्यमातून मोठी भेट देखील दिली जात आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात महाराष्ट्राला दोन वंदे भारत एक्सप्रेस मिळाले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर या दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ला पीएम मोदी यांनी गेल्या महिन्यात हिरवा झेंडा दाखवला आहे. रेल्वेच्या ताब्यात आलेल्या या वंदे भारत एक्सप्रेस अल्पावधीतच लोकप्रिय देखील झाल्या आहेत.
यामुळे राज्यातील रेल्वे प्रवास अधिक गतिमान होण्यास मदत झाली आहे. याशिवाय महाराष्ट्राला आणखी दोन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहेत. पुणे सिकंदराबाद आणि मुंबई गोवा या मार्गावर लवकरच दोन वंदे भारत गाड्या सुरू करण्याचा मानस रेल्वेचा आहे. रेल्वे बोर्डाने याबाबत संकेतही दिले आहेत.
हे पण वाचा :- केंद्र सरकारची मोठी घोषणा; आता सर्वसामान्यांना एलपीजी सिलेंडर मिळणार मात्र ‘इतक्या’ रुपयात, सबसिडी वाढवली, पहा….
मात्र या गाड्या केव्हा सुरू होतील याबाबत अद्याप माहिती हाती आलेली नाही. दरम्यान आता ईशान्येकडील राज्यांना केंद्राकडून मोठी बैठक मिळण्याची शक्यता आहे. हाती आलेल्या माहितीनुसार 14 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे गुवाहाटी आणि न्यू जलपाईगुडी या दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईशान्यकडील राज्यांना पहिली वंदे भारत एक्सप्रेस ची भेट दिली जाणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
ईशान्य फ्रंटियर रेल्वे म्हणजे NFR ने या प्रदेशात या ट्रेनच्या भव्य प्रक्षेपणासाठी आधीच तयारी सुरू केली असल्याची माहिती एका मीडिया रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, गुवाहाटी आणि न्यू जलपाईगुडी दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच सुरू होणार आहे. 14 एप्रिल रोजी पंतप्रधान गुवाहाटीला जाणार आहेत आणि या दौऱ्यामध्येच ही विशेष ट्रेन सुरू करण्याचे आमचे लक्ष्य असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कापूस बियाणे इतक्या रुपयांनी वाढले, लागवडीचा खर्च वाढणार
निश्चितच या रूटवर वंदे भारत गाडी सुरू होणार असल्याने तेथील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. दरम्यान महाराष्ट्राला वेध लागलेल्या मुंबई-गोवा या रूट वर धावणारी वंदे भारत गाडी केव्हा सुरू होईल हा देखील प्रश्न यानिमित्ताने प्रवाशांकडून उपस्थित होत आहे. मात्र जसे की आपणास ठाऊकच आहे कि, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या रूटवरील विद्युतीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असून लवकरच या रूटवर वंदे भारत गाडी सुरू होईल अशी माहिती दिली आहे.
यामुळे या रूटवर लोकसभा निवडणुकीपूर्वीच वंदे भारत ट्रेन धावू शकते असा दावा काही जाणकार लोकांकडून केला जात आहे. निश्चितच मुंबई ते गोवा दरम्यान वंदे भारत गाडी सुरू झाली तर पर्यटकांना याचा मोठा बेनिफिट होणार आहे. यामुळे ग्लोबल पर्यटन स्थळ परस्परांना कनेक्ट होणार आहेत आणि या दोन्ही शहरांदरम्यान प्रवास करताना मोठा वेळ वाचणार आहे.
हे पण वाचा :- 10वी पास तरुणांसाठी नोकरीचा गोल्डन चान्स! सीआरपीएफ मध्ये तब्बल 9212 जागांसाठी मेगा भरती, पहा भरतीची सविस्तर माहिती एका क्लिकवर