New Mumbai News : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई शहर व उपनगर यामधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वेगवेगळे रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये नवी मुंबई ते डोंबिवली दरम्यान चा प्रवास अधिक गतिमान करण्यासाठी ऐरोली – काटई नाका उन्नत मार्ग प्रकल्पाचा देखील समावेश होतो. दरम्यान आता या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. सर्वप्रथम या उन्नत मार्गाबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊया.
खरं पाहता नवी मुंबई ते डोंबिवली दरम्यान चे अंतर कमी करण्यासाठी या प्रकल्पाचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे. हा उन्नत मार्ग प्रकल्प एकूण साडेबारा किलोमीटर लांबीचा आहे. यामुळे ऐरोली ते डोंबिवली दरम्यान चे अंतर तब्बल दहा किलोमीटरने कमी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
निश्चितच हा प्रकल्प नवी मुंबई आणि डोंबिवली वासियांसाठी अति महत्त्वाचा आहे. दरम्यान या प्रकल्पाचे काम जलद गतीने करण्यासाठी प्राधिकरणाकडून प्रयत्न सुरू आहेत. हेच कारण आहे की या प्रकल्पाचे काम एका टप्प्यात न करता एकूण तीन टप्प्यात सुरू आहे.
हे पण वाचा :- डोंबिवली, ठाणेकरांना मिळणार मोठी भेट ! ‘या’ महिन्यात सुरु होणार मोठा गाव-माणकोली खाडी पूल, उद्घाटनाची नवीन तारीख जाहीर, पहा…..
कसे आहेत या उन्नत मार्गाचे तीन टप्पे?
या प्रकल्पांतर्गत एकूण तीन टप्प्यात काम सुरू असून यापैकी पहिल्या टप्प्याचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पहिल्या टप्प्यात ठाणे – बेलापूर रस्ता आणि नॅशनल हायवे 4 म्हणजे जुना मुंबई पुणे महामार्ग दरम्यान जवळपास पावणे चार किमी लांबीच्या रस्त्याच्या बांधकामाचा समावेश करण्यात आला आहे.
यात दुहेरी बोगद्याचा देखील समावेश आहे. हा दुहेरी बोगदा ३ – ३ मार्गिकांचा आहे. बोगद्याची एकूण लांबी १.६९ किमी इतकी आहे. दरम्यान बोगद्याचे जवळपास 66 टक्के काम पूर्ण झाले आहे तर उर्वरित मार्गाचे ९२ टक्के काम पूर्ण झाले आहे.
या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याबाबत बोलायचं झालं तर या अंतर्गत 2.57 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग तयार होत आहे. या दुसऱ्या टप्प्याचे देखील 68% काम जवळपास पूर्ण झाले आहे.
तसेच या प्रकल्पाच्या तिसर्या टप्प्यात कल्याण-शीळ रोड येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ते काटई नाका यांना जोडणारा ६.३० किमीचा पूर्ण उन्नत मार्ग तयार केला जाणार आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; नेरुळ-उरण रेल्वे मार्ग उद्घाटनाची तारीख हुकली, आता ‘या’ दिवशी सुरु होणार हा मार्ग
पहिल्या टप्प्याचे हे महत्त्वाचे काम झाले पूर्ण
दरम्यान आता या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याबाबत म्हणजे ठाणे – बेलापूर रस्ता आणि नॅशनल हायवे 4 म्हणजे जुना मुंबई पुणे महामार्ग दरम्यान जवळपास पावणे चार किमी लांबीच्या रस्त्याच्या कामाबाबत मोठी माहिती हाती आली आहे. एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, या पहिल्या टप्प्या अंतर्गत येणाऱ्या ऐरोलीच्या दिशेने शेवटचा गर्डर बसविण्यात आला आहे.
तर ठाणे- बेलापूर मार्गावरील भारत बिजली जंक्शन ऐरोली येथील एकूण १६ पीएससी आय गर्डरही यशस्वीपणे बसविण्यात आले आहेत. यामुळे आता ऐरोली – काटई नाका उन्नत मार्ग प्रकल्पांतर्गत येणारे तिन्ही टप्पे एकमेकांना जोडले जाणार आहेत. दरम्यान हा पहिला टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो असा दावा केला जात आहे. या पहिल्या टप्प्याचे काम नेमके केव्हा पूर्ण होणार याबाबत संबंधितांकडून कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही.
मात्र या पहिल्या टप्प्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच हा टप्पा वाहतुकीसाठी खुला होणार आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐरोली – काटई नाका उन्नत मार्ग जेव्हा पूर्णपणे बांधून तयार होईल तेव्हा नवी मुंबई ते डोंबिवली दरम्यान प्रवास करताना दहा किलोमीटरचे अंतर वाचणार आहे. यामुळे नवी मुंबई ते डोंबिवली हा प्रवास मात्र 15 मिनिटात शक्य होणार आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो सावधान ! एप्रिल महिन्यात ‘इतके’ दिवस अवकाळी पाऊस पडणार; भारतीय हवामान विभागाचा इशारा