New Mumbai Metro Project : नवी मुंबईकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. लवकरच नवी मुंबई मेट्रोचे काम पूर्ण होणार असून आता येथील प्रवाशांचे मेट्रो ने प्रवास करण्याच स्वप्न पूर्ण होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिडकोने नुकतेच महा मेट्रोला बेलापूर ते पेंधर या मार्गाचे काम एप्रिल पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच रेल्वे विभागाकडून देखील पेंधर ते तळोजा या मार्गावर येत्या दोन दिवसांत चाचणी घेतली जाणार आहे. वास्तवि, या बेलापूर ते पेंधर मार्गाचे काम बारा वर्षांपूर्वी सुरु झाले आहे. मात्र या कामात एक ना अनेक अडथळे उपस्थित झालेत. परिणामी या मार्गाचे काम रखडले.
हे पण वाचा :- मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस आता ‘या’ स्टेशनवर पण थांबणार ! केंद्रीय मंत्र्यांने दिली माहिती
हे काम पूर्वी सिडकोच करत होते मात्र सिडको ने काम जलद गतीने होत नसल्याने या कामाची जबाबदारी महा मेट्रोला सोपवली. आता हा मार्ग एप्रिल अखेर पर्यंत पूर्ण करण्यासाठी सिडको ने महामेट्रोला आदेश दिले आहेत. साहजिकच हा मेट्रो मार्ग या महिन्याच्या अखेर पर्यंत पूर्ण होण्याचे चित्र आहे. यामुळे लवकरच नवी मुंबईकरांना मेट्रोची भेट मिळणार आहे.
तसेच येत्या 17 एप्रिल पासून म्हणजे आगामी दोन दिवसांत रेल्वे विभागाकडून पेंधर ते तळोजा मेट्रो मार्गावर अंतिम चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती एका मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून समोर आली आहे. ही फायनल चाचणी पूर्ण झाली की मग रेल्वेकडून प्रमाणपत्र मिळेल आणि मग नवी मुंबई मेट्रोला हिरवा कंदील सिडको दाखवेल अशी माहिती जाणकार लोकांनी दिली आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांना मिळणार मोठ गिफ्ट; आता मुंबई ते ‘या’ शहरादरम्यान धावणार वंदे भारत एक्सप्रेस !
केव्हा होणार नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन
हाती आलेल्या माहितीनुसार, बेलापूर ते पेंधर या महा मेट्रोच्या माध्यमातून विकसित केल्या जाणाऱ्या मेट्रो मार्गांवरील रेल्वे ट्रॅक, वीजवाहिन्या, सीसी टीव्ही नियंत्रण कक्ष, रेल्वेस्थानकावरील सरकत्या जिन्यांची म्हणजे एस्कीलेटरची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच प्रत्येक स्थानकावर वाहनतळाचे काम पूर्ण झाले आहे. म्हणजेच या मार्गाचे बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत. जी काही किरकोळ कामे राहिली आहेत ती देखील अंतिम टप्प्यात आली आहेत.
अशा परिस्थितीत एप्रिल अखेर या मार्गाचे पूर्ण काम होण्याची शक्यता आहे. एप्रिल अखेर जर याचे काम झाले तर मे महिन्यात या मार्गावर मेट्रो सेवा सुरू केली जाऊ शकते अशी माहिती एका मीडिया रिपोर्ट मधून देण्यात आली आहे. यामुळे आता मे महिन्यातील नेमक्या कोणत्या तारखेला या मार्गाचे उद्घाटन होते याकडे आता नवी मुंबई समवेतच संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहणार आहे.