Navi Mumbai Railway News : दिवाळीच्या सणाला नवी मुंबईकरांना मध्य रेल्वे कडून एक मोठी भेट मिळणार आहे. नवी मुंबईमधील तब्बल अडीच दशकांपासून रखडलेला एक रेल्वे मार्ग सुरू होणार आहे. यामुळे नवी मुंबई मधील नागरिकांचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे. खरंतर, नवी मुंबईमध्ये 25 वर्षांपूर्वी नेरूळ ते उरण रेल्वे मार्ग विकसित करण्यासाठी मंजुरी मिळाली होती.
मात्र तदनंतर विविध कारणांमुळे हा रेल्वे मार्ग रखडला. पण कासवगतीने का होईना पण या प्रकल्पाचे काम सुरू राहिले आणि 2018 मध्ये या रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नेरूळ ते खारकोपर सुरु करण्यात आला आहे. पण रेल्वे मार्गाचा दुसरा टप्पा अजूनही सुरू झालेला नाही.
म्हणून या रेल्वे मार्गाचा दुसरा टप्पा अर्थातच खारकोपर ते उरण हा केव्हा सुरू होणार हा प्रश्न उरणकरांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्याण या खारकोपर ते उरण या रेल्वे मार्गाबाबत एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे.
खरतर या रेल्वे मार्गासाठी आठ महिन्यांपूर्वी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी सुरक्षा प्रमाणपत्र बहाल केले होते. रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे प्रमाणपत्र मिळाले यामुळे लवकरच या मार्गावर रेल्वे सुरू होणार असे सांगितले जात होते. पण अजूनही हा रेल्वे मार्ग सुरू झालेला नाही.
हा रेल्वे मार्ग सुरू करण्यासाठी तारीख पे तारीख दिली जात आहे. पण आता रेल्वे बोर्डाने या मार्गावर लोकल सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी रेल्वे बोर्डाने या मार्गावर लोकल सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.
रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाली असल्याने आता लवकरच खारकोपर ते उरण दरम्यान लोकल ट्रेन धावणार आहे. त्यामुळे उरणकरांचे गेल्या अडीच दशकांपासूनचे स्वप्न खरं ठरणार आहे.पण या मार्गावर लोकल केव्हा धावणार हा मोठा प्रश्न अजूनही कायमच आहे.
दरम्यान, हा मार्ग सुरू झाल्यानंतर खारकोपर ते उरण दरम्यान 40 लोकल फेऱ्या सुरू केल्या जातील अशी माहिती समोर आली आहे. सध्या नेरूळ आणि बेलापूर पासून खारकोपर पर्यंत लोकलच्या 20 फेऱ्या चालवल्या जात आहेत.
या 20 फेऱ्यांपैकी काही लोकल फेऱ्या थेट उरण पर्यंत विस्तारित केल्या जाणार आहेत आणि काही नवीन लोकल फेऱ्याही चालवल्या जाणार आहेत.
यामुळे मुंबई, नवी मुंबई, पनवेल, उरण या भागातील कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. उरणकरांना या मार्गामुळे थेट सीएसएमटीपर्यंत लोकलने प्रवास करता येणार आहे.
निश्चितच उरणकरांसाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी राहणार आहे. तथापि, या मार्गावर आता रेल्वे बोर्डाने लोकल सुरू करण्यास परवानगी दिली असल्याने या मार्गांवर लवकरात लवकर लोकल धावावी अशी उरणकरांची इच्छा आहे.