Navi Mumbai Lottery News : मुंबई आणि नवी मुंबई सारख्या शहरांमध्ये घर घेणे म्हणजेच दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे अशी गत झाली आहे. मुंबई प्रमाणेच नवी मुंबईमध्ये देखील गेल्या काही वर्षांमध्ये घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत. हेच कारण आहे की, नवी मुंबईत घर घेऊ इच्छिणारी बहुतांशी जनता नेहमीच सिडकोच्या घरांची वाट पाहत असते.
सिडको नवी मुंबई मध्ये सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा दरात घरांची उपलब्धता करून देत असते. या घरांसाठी सिडको कडून दरवर्षी लॉटरी काढली जात असते. यंदाही सिडको नवी मुंबई मधील हजारो घरांसाठी लॉटरी जाहीर करणार आहे.
दरम्यान, सिडकोच्या घरांची वाट पाहणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजयादशमी अर्थातच दसऱ्याच्या मुहूर्तावर सिडको प्राधिकरण तब्बल चाळीस हजार घरांसाठी लॉटरी जाहीर करण्याची शक्यता आहे.
नवी मुंबईत अगदीच मोक्याच्या ठिकाणी ही घरे राहणार असून या आगामी सोडतीमुळे हजारो नागरिकांचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या सिडकोच्या आगामी लॉटरीची सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या भागातील घरांचा समावेश राहणार ?
वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरुळ आणि खांदेश्वर या भागातील घरांचा सिडकोच्या आगामी लॉटरीत समावेश राहणार आहे. नवी मुंबईतील अगदीच मोक्याच्या ठिकाणी म्हणजेच रेल्वे स्थानकाजवळच्या घरांसाठी ही लॉटरी काढली जाणार आहे.
नक्कीच ज्या लोकांना नवी मुंबईत घर खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे. महत्त्वाचे म्हणजे नागरिकांना कोणत्या मजल्यावर घर हवे आहे याची मुभा देखील अर्जदारांना मिळणार आहे.
अद्याप या घरांच्या किमती संदर्भात आणि घराच्या आकारमानासंदर्भात कोणतीचं माहिती हाती आलेली नाही. या सोडतीची जाहिरात कधी निघणार हे देखील अजून गुलदस्त्यातच आहे. मात्र, काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर ही सोडत जाहीर होणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्यामुळे नक्कीच नवी मुंबईत हक्काचे घर शोधणाऱ्यांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी ठरणार आहे. जर तुम्हीही या सोडतीत अर्ज करू इच्छित असाल तर तुम्हाला आत्तापासूनच कागदपत्रांची जमवाजमव करून ठेवावी लागणार आहे, सोबतच या घरांसाठी तुम्हाला अनामत रक्कम सुद्धा मॅनेज करावी लागणार आहे.