Nanded Successful Farmer : मराठवाडा म्हटलं की डोळ्यापुढे उभे राहत ते भयानक दुष्काळाचे चित्र. मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. दुष्काळामुळे येथील शेतकऱ्यांना शेतीतून फारसे उत्पादन मिळत नाही.
शिवाय उत्पादित झालेल्या शेतमालाला देखील बाजारात अपेक्षित भाव नसल्याने येथील शेतकरी दुहेरी आर्थिक कोंडीत सापडत आहेत. मात्र आता येथील अनेक प्रयोगशील आणि उच्चशिक्षित शेतकऱ्यांनी शेतीमध्ये नवखे प्रयोग सुरू केले आहेत. या प्रयोगाच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांना आता चांगली कमाई होऊ लागली आहे. नांदेड हा देखील मराठवाड्यातील असाच एक जिल्हा आहे.
हे पण वाचा :- ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ सागरी मार्गाच्या प्रस्तावाला एमएमआरडीएची परवानगी, ठाण्यातील वाहतूक कोंडी फुटणार, पहा….
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून अटकेपार आपला झेंडा रोवला आहे. दरम्यान, आता नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याच्या पलाईगुडा येथील उच्चशिक्षित शेतकऱ्याचा एक भन्नाट प्रयोग समोर आला आहे.
पलाईगुडा येथील अमोल आडे या उच्च शिक्षित नवयुवक तरुणाने थाई जातीच्या लिंबाची लागवड केली आहे. या लिंबाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यापासून 12 महिने उत्पादन मिळू शकते. विशेष म्हणजे या जातीचे लिंबू बाजारात कायमच चांगल्या दरात विक्री होतात. या लिंबाची साल ही इतर जातीच्या तुलनेत जाड असल्याने अधिक काळ हे लिंबू टिकतात यामुळे याला चांगला दर मिळतो.
हे पण वाचा :- ब्रेकिंग ; पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ‘या’ वंदे भारत एक्सप्रेसला दाखवणार हिरवा झेंडा !
याच पार्श्वभूमीवर अमोल यांनी या जातीच्या लिंबाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी विशेष बाब अशी की, या जातीच्या लिंबापासून उत्पादन घेण्यासाठी त्यांनी रासायनिक खतांचा अजिबात वापर न करता केवळ आणि केवळ सेंद्रिय खतांचा वापर करून त्यातून चांगले उत्पादन मिळवून दाखवले आहे. अमोल सांगतात की आता उन्हाळा सुरू झाला असून या लिंबांना बाजारात मोठी मागणी आहे.
त्यांनी दोन एकरात या लिंबाची बाग फुलवली असून यातून त्यांना जवळपास अडीच लाखांची कमाई होण्याची अशी आहे. ते सांगतात की या जातीचे लिंबू आकाराने थोडे मोठे आहेत यामुळे हॉटेल व्यवसायिकांमध्ये याला मोठी मागणी आहे. एकंदरीत थाई लिंबू लागवडीचा हा प्रयोग या उच्चशिक्षित तरुणांसाठी फायदेशीर ठरला असून या प्रयोगाची भुरळ अनेकांना पडली आहे. निश्चितच मराठवाड्यातील या अवलिया शेतकऱ्याने केलेला हा प्रयोग राज्यातील इतर अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी राहणार आहे.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ भागातील वाहतूक तब्बल 21 एप्रिल पर्यंत राहणार बंद, पहा सविस्तर