Namo Shetkari Yojana : राज्य शासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यातील पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेची घोषणा केली आहे. पीएम किसान योजना ही केंद्रातील मोदी सरकारने 2019 मध्ये सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे एकूण तीन हप्त्यात दरवर्षी सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांना मिळतात. दर चार महिन्यांनी या योजनेचा एक हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जातो.
आतापर्यंत या योजनेचे 14 हफ्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. दरम्यान याच योजनेच्या धर्तीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनात नमो शेतकरी योजनेची घोषणा करण्यात आली आहे. मार्च महिन्यात या योजनेची घोषणा झाली आणि जून अखेर पर्यंत या योजनेचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याचे नियोजन करण्यात आले होते.
मात्र शासनाला या योजनेचा पहिला हप्ता नियोजित वेळेत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करता येऊ शकला नाही. मध्यंतरी या योजनेचा पहिला हफ्ता पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हफ्त्यासोबत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाऊ शकतो असे सांगितले जात होते.
पण असे काही घडले नाही पीएम किसानचा चौदावा हप्ता वर्ग होऊन आता तीन महिन्यांचा काळ उलटत चालला आहे. मात्र तरीही नमो शेतकरीचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळालेला नाही. यामुळे नमो शेतकरीचा पहिला हप्ता केव्हा मिळणार असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच नमो शेतकरीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर देखील पाहायला मिळत आहे.
अशातच मात्र नमो शेतकरी बाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती समोर आली आहे. खरंतर नमो शेतकरीसाठी चार हजार कोटी रुपयांची शासनाने तरतूद केली आहे. पण या योजनेचा पहिला हप्ता अजून शेतकऱ्यांना मिळालेला नाही. मात्र आता लवकरच या योजनेचा पहिला हप्ता मिळणार आहे. या योजनेचा पहिला हप्ता घटस्थापनेच्या दिवशी शेतकऱ्यांचा खात्यात वर्ग होऊ शकतो असा दावा काही मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे.
एवढेच नाही तर या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता सोबतच शेतकऱ्यांना देण्यासाठी शासन दरबारी चर्चा सुरू असल्याचे वृत्त देखील समोर आले आहे. परंतु याबाबत महाराष्ट्र राज्य शासनाने कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही.
पण जर शासनाने पहिला आणि दुसरा हप्ता सोबतच शेतकऱ्यांना दिला तर राज्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे यात शंकाच नाही. त्यामुळे आता नमो शेतकरीचा पहिला आणि दुसरा हप्ता सोबतच शेतकऱ्यांना मिळतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.
तसेच मीडिया रिपोर्ट्स मध्ये सांगितल्याप्रमाणे या योजनेचा हप्ता घटस्थापनेच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होतो का याकडे देखील संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे बारीक लक्ष लागून राहणार आहे.