Namo Shetkari Yojana : पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरीच्या चौथ्या हफ्त्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. या योजनेचा पुढील चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार हा मोठा सवाल अजूनही कायमच आहे. खरेतर या योजनेचा चौथा हप्ता जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत वर्ग होणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात होता.
परंतु सरकारने जुलै महिन्यात या योजनेचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला नाही. यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता
आणि नमो शेतकरीचा दुसरा आणि तिसरा हप्ता शेतकऱ्यांना एकाच दिवशी दिला गेला होता. तदनंतर जून महिन्यात पीएम किसानचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला.
पण नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता अजून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडीशी संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे. अशातच आता या योजने संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
कधी मिळणार नमो शेतकरी चा चौथा हप्ता ?
नमो शेतकरी महासन्माननिधी योजना ही पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पीएम किसानच्या पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी अतिरिक्त सहा हजार रुपये दिले जात आहेत.
हे पैसे दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे दिले जातात. म्हणजेच नमो शेतकरी ते 6000 आणि पीएम किसानचे 6000 असे एकूण 12,000 राज्यातील पात्र शेतकऱ्यांना मिळत आहेत. आतापर्यंत नमो शेतकरीचे तीन हफ्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत.
यामुळे शेतकरी पुढील हफ्त्याची वाट पाहत आहेत. दरम्यान ऑक्टोबर महिन्यात राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा थरार रंगणार असल्याने या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच नमो शेतकरीचा पुढील हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
म्हणजेच विधानसभा निवडणुकीची टाइमिंग साधण्याचा प्रयत्न वर्तमान शिंदे सरकारकडून सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकांची लवकरच भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून घोषणा होणार आहे आणि आचारसंहिता सुरू होणार आहे.
दरम्यान ही आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले जाणार आहेत. नमो शेतकरीचा पुढील हप्ता देखील शेतकऱ्यांना लवकरच दिला जाणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत नमो शेतकरीचा चौथा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो अशी आशा व्यक्त केली जात आहे.