Namo Shetkari Yojana : केंद्र शासनाने 2019 मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. म्हणजेच ही योजना सुरू होऊन आत्ता जवळपास पाच वर्षांचा काळ पूर्ण झाला आहे. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पात्र शेतकऱ्यांना 30 हजारापर्यंतचा लाभ देण्यात आला आहे.
म्हणजेच पात्र शेतकऱ्याला 15 हप्ते मिळाले आहेत. या योजनेअंतर्गत दरवर्षी दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे तीन हप्त्यात सहा हजार रुपयांची रक्कम मिळतं असते. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांमध्ये अल्प कालावधीतच लोकप्रिय ठरली.
परिणामी अशीच योजना महाराष्ट्र राज्य शासनाने आपल्या महाराष्ट्रात राबवण्याचा मोठा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासनाने पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे.
नमो शेतकरी योजनेअंतर्गतही शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये, 2 हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे वितरित केले जात आहेत.
म्हणजेच पीएम किसान चे 6000 आणि नमो शेतकऱ्याचे 6000 असे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपये आता मिळणार आहेत.
एकीकडे पीएम किसानच्या आत्तापर्यंत 15 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत आणि त्यांना लवकरच सोळावा हप्ता दिला जाणार आहे तर दुसरीकडे नमो शेतकरीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे.
विशेष म्हणजे नमो शेतकरीचा दुसरा हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून यासाठी शिंदे सरकारने 1792 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नमो शेतकरीचा दुसरा हप्ता केव्हा खात्यात जमा होणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
केव्हा जमा होणार दुसरा हफ्ता ?
काल, 21 फेब्रुवारी 2024 रोजी शिंदे-फडणवीस-पवार सरकारने एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. यानुसार, नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी १ हजार ७९२ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याचा मोठा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे.
विशेष म्हणजे हा निधी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता सुद्धा मिळाली आहे.
दरम्यान कृषी मंत्री यांनी या योजनेचा दुसरा हप्ता हा फेब्रुवारी अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती दिली आहे. नमो शेतकरीच्या दुसऱ्या हप्त्याचा लाख 90 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार आहे.