Namo Shetkari Yojana : चार दिवसांपूर्वी अर्थातच 18 जूनला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच पीएम किसान योजनेच्या सतराव्या हफ्त्याबाबत निर्णय घेतला आहे. पी एम किसान योजना ही केंद्रातील मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे.
या योजनेला आता पाच वर्षांचा काळ पूर्ण झाला आहे. या अंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकमुस्त मिळत नाहीत. दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जात असते.
लोकसभा निवडणुकीच्या आधी या योजनेचे एकूण 16 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले होते. सोळावा हप्ता हा 28 फेब्रुवारी 2024 ला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. तसेच या योजनेचा सतरावा हप्ता हा लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे म्हटले जात होते.
यानुसार निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच पीएम किसानचा 17 वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. 18 जून 2024 ला या योजनेचा सतरावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथे आयोजित एका शेतकरी परिषदेतून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.
खरे तर या योजनेचा सोळावा हप्ता आणि या योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्यातील नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता 28 फेब्रुवारीला सोबतच जमा करण्यात आला होता. यामुळे जेव्हा पीएम किसान चा 17 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळेल त्यावेळी नमो शेतकरी चा चौथा हप्ता देखील दिला जाईल असे वाटत होते.
अनेक मीडिया रिपोर्ट मध्ये असा दावाही करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात पीएम किसान चा सतरावा हप्ता जमा झालेला असतानाही नमो शेतकरी चा चौथा हप्ता अजून शेतकऱ्यांच्या खात्यात आलेला नाही.
यामुळे नमो शेतकरी चा पुढील चौथा हप्ता नेमका महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात कधीपर्यंत जमा होणार हा मोठा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान याच संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
खरे तर येत्या काही महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने तयारी देखील सुरू केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार यावर्षी विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच नमो शेतकरी चा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी शिंदे सरकार नमो शेतकरी चा चौथा हप्ता पुढील जुलै महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करू शकते असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे.
तथापि या संदर्भात सरकारच्या माध्यमातून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यामुळे याचा चौथा हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यात कधीपर्यंत येणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.