Namo Shetkari Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये करण्यात आली होती. 2019 मध्ये सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून ही योजना अविरतपणे सुरू आहे.
या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. एका वर्षात 2 हजार रुपयाचा एक हप्ता असे एकूण तीन हफ्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात.
आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 15 हफ्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून 16वा हप्ता हा येत्या काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अशी माहिती काही प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून समोर आलेली आहे.
या योजनेची लोकप्रियता पाहून आपल्या महाराष्ट्रात वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकारने नमो शेतकरी योजना नावाची एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. ही योजना पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली असून या योजनेचे स्वरूप पीएम किसान सारखेच आहे.
नमो शेतकरी योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. 2 हजाराचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण होणार आहे. नमो शेतकरी योजनेअंतर्गत एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.
यामुळे या योजनेचा दुसरा हप्ता केव्हा जमा होणार हा मोठा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय. दरम्यान, याच संदर्भात एक मोठी माहिती समोर येत आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, शिंदे सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो.
म्हणजेच या चालू महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
8 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान या योजनेचा दुसरा हप्ता पात्र शेतकऱ्यांना दिला जाईल असा दावा काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये केला जातोय.
तथापि, हा फक्त दावा आहे याबाबत शिंदे सरकारने कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही. यामुळे दुसरा हप्ता 10 फेब्रुवारीपर्यंत मिळणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.