Namo Shetkari Yojana : केंद्र आणि राज्य शासनाकडून देशातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा देखील समावेश होतो. खरंतर, नमो शेतकरी योजना ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत ज्याप्रमाणे वार्षिक सहा हजार रुपये पात्र लाभार्थ्यांना मिळत आहेत त्याचप्रमाणे नमो शेतकरी अंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये आता पात्र लाभार्थ्यांना दिले जाणार आहेत. म्हणजेच पीएम किसानचे 6 आणि नमो शेतकरीचे 6 असे एकूण 12 हजार रुपये पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
2 हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे वार्षिक समान तीन हप्त्यात या दोन्ही योजनेअंतर्गत पैसे दिले जाणार आहेत. अशातच, आता नमो शेतकरी योजनेच्या बाबतीत एक मोठे अपडेट समोर आली आहे. पहिल्या हप्त्याला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. पहिल्या हफ्त्यासाठी १७२० कोटी रुपयांच्या खर्चास राज्य शासनाने मान्यता दिली असून राज्य शासनाकडून हा निधी कृषी विभागाला वर्ग झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे आता या योजनेचा पहिला हप्ता हा विजयादशमीच्या आधीच म्हणजेच दसऱ्याच्या आधीच पात्र शेतकऱ्यांना मिळू शकतो असे काही मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले जात आहे. दरम्यान या योजनेच्या पहिल्या हप्त्यापासून राज्यातील लाखो शेतकरी वंचित राहतील अशी धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे.
खरंतर पीएम किसान साठी जे शेतकरी पात्र ठरणार आहेत त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा पहिला हप्ता मिळणार आहे. म्हणजेच पीएम किसान साठी पात्र ठरत असलेल्या ८० लाख वीस हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी चा पहिला हप्ता मिळणार आहे.
तसेच नमो शेतकरीचा लाभ हा ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे त्यांनाच दिला जाणार आहे. यामुळे राज्यातील जवळपास पाच लाखाहून अधिक शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा पहिला हप्ता मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे. आता आपण नमो शेतकरी योजनेसाठी आवश्यक असलेल्या पात्रता थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
नमो शेतकरी योजनेच्या पात्रता
या योजनेचा लाभ दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे.
एका कुटुंबातील केवळ एकाच सदस्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे. कुटुंबातील पती किंवा पत्नी या दोघांपैकी एकाला या योजनेचा लाभ मिळेल.
आमदार, खासदार, पंचायत समिती सदस्य, जिल्हा पंचायत समिती सदस्य यांसारख्या लोकांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.
सरकारी कर्मचाऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.
इन्कम टॅक्स म्हणजे आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
2019 पूर्वी ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
ज्यांच्या नावावर जमीन नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
पीएम किसानचा लाभ देशभरातील शेतकऱ्यांना घेता येतोय कारण की ती एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे. परंतु नमो शेतकरीचा लाभ हा महाराष्ट्रातील रहिवासी शेतकऱ्यांना मिळणार आहे.