Namo Shetkari Yojana : भारत एक कृषीप्रधान देश आहे. महाराष्ट्र देखील एक शेतीप्रधान राज्य आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान, केंद्र शासनाने 2019 मध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक कल्याणासाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे तीन हप्ते दिले जात आहेत.
पीएम किसान योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना 6,000 रुपयाचा लाभ मिळत आहे. चार महिन्यांनी या योजनेचा एक हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो.
विशेष म्हणजे केंद्राची ही योजना एवढी लोकप्रिय ठरली आहे की, या योजनेची भुरळ महाराष्ट्र राज्य शासनाला देखील पडली. यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाने पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात नमो शेतकरी योजना सुरू केली आहे.
या नमो शेतकरी योजनेअंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जात आहेत. राज्यातील या योजनेचे स्वरूप अगदी पीएम किसान योजनेप्रमाणेच आहे.
म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसानचे 6,000 आणि नमो शेतकरीचे सहा हजार असा एकूण 12,000 रुपयाचा वार्षिक लाभ मिळणार आहे. दरम्यान नमो शेतकरीचा पहिला हप्ता हा नुकत्याच काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे.
तसेच पीएम किसान योजनेचा पंधरावा हफ्ता 15 नोव्हेंबर 2023 ला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. यामुळे पीएम किसान चा 16 वा हप्ता आणि नमो शेतकरीचा दुसरा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर केव्हा जमा होणार हा सवाल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित होत आहे.
दरम्यान याच संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नमो शेतकरीचा दुसरा हप्ता आणि पीएम किसानचा पुढील सोळावा हप्ता फेब्रुवारी 2024 अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे.
मीडिया रिपोर्टनुसार पीएम किसानचे 2000 आणि नमो शेतकऱ्याचे 2000 असे 4000 रुपये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीचं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत.
विशेष म्हणजे याबाबतची कारवाई शासन दरबारी सुरू देखील झाली आहे. त्यामुळे फेब्रुवारीत राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त होत आहे.