Namo Shetkari Yojana : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अधिक खास राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा पुढील हफ्ता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, राज्यातील शिंदे सरकारने केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु केली आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे वितरित केले जात आहेत. आतापर्यंत या योजनेअंतर्गत एकूण 17 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत.
दरम्यान याच केंद्रीय योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. राज्याच्या या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत मिळते.
म्हणजेच राज्यातील पीएम किसानच्या पात्र लाभार्थ्यांना पीएम किसान से 6000 आणि नमो शेतकरीचे 6000 असे एकूण बारा हजार रुपये मिळतात. नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांना एकूण तीन हप्ते मिळालेले आहेत.
नमो शेतकरीचा दुसरा आणि तिसरा हफ्ता शेतकऱ्यांना सोबतच दिला गेला होता. हे हफ्ते 28 फेब्रुवारी 2024 ला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले होते. यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा पुढील हफ्ता म्हणजे चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत जमा होणार यासंदर्भात विचारणा केली जात आहे.
दरम्यान याच संदर्भात आता एक मोठी माहिती समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील चौथा हप्ता हा 31 जुलै पर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे.
खरंतर ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे या विधानसभा निवडणुकांच्या आधी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत.
नमो शेतकरी योजनेचे पुढील हफ्त्याचे म्हणजे चौथ्या हप्त्याचे पैसे हे या जुलै महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता आहे. निश्चितच नमो शेतकरीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्यास आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना याने मोठा दिलासा मिळणार आहे.
तथापि नमो शेतकरी च्या पुढील हफ्त्यासंदर्भात अजून महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून कोणतेच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यामुळे या योजनेचा हप्ता 31 जुलैपर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार का हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.