Namo Shetkari Yojana : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून पी एम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. शिंदेफडणवीस सरकारने या नमो शेतकरी योजनेची घोषणा अर्थसंकल्प 2023-24 मध्ये केली आहे.
रम्यान या योजनेबाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा पहिला हप्ता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेप्रमाणे लाभ दिला जाणार आहे. विशेष म्हणजे पी एम किसान योजनेसाठी जे शेतकरी पात्र असतील तेच नमो शेतकरी साठी राहणार आहेत.
आता पीएम किसानचा चौदावा हफ्ता 10 जून पूर्वी शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याचवेळी नमो शेतकऱ्याचा देखील हप्ता दिला जाणार आहे. म्हणजे येत्या पीएम किसानच्या 2 हजारासोबत नमो शेतकरीचे 2 हजार पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; यंदा कोणत्या नक्षत्रात पडणार अधिक पाऊस अन कोणत्या नक्षत्रात कमी, वाचा याविषयी सविस्तर
किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
नमो शेतकरीचा लाभ राज्यातील 71 लाख पीएम किसान च्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच राज्यातील 32 लाख 37 हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा लाभ मिळणार नाही.
वास्तविक पी एम किसान आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी बॅंक खात्याला आधार लिंक करणे, तसेच ई-केवायसी आणि शेतकऱ्यांनी त्यांच्या नावावरील मालमत्तेची नोंद ऑनलाइन देणे आवश्यक आहे.
पण, राज्यातील 32 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी या प्रक्रिया पूर्ण केलेल्या नाहीत. म्हणून या 32 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पहिलाच हप्ता दिला जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो, आता मल्चिंग पेपर साठी मिळणार 50 टक्के अनुदान; योजनेचे निकष, पात्रता अन अर्ज करण्याची पद्धत; वाचा….
मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेसाठी आवश्यक आधार सिडिंग अकरा लाख शेतकऱ्यांनी केलेले नाही, दोन लाख 66 हजार शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीची माहिती दिलेली नाही, आणि 18 लाख 71 हजार शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही. म्हणून या लाखो शेतकऱ्यांना नमो शेतकरी चा पहिला हप्ता आणि पीएम किसान चा चौदावा हप्ता मिळणार नाही.
कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान चा लाभ मिळत आहे त्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर 2018 पूर्वी शेतजमीन आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. दोन हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; भाताची रोवणी न करता ‘या’ पद्धतीने लागवड केल्यास उत्पादनात होणार भरीव वाढ, पहा डिटेल्स