Namo Shetkari Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. केंद्राच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. ही केंद्रातील मोदी सरकारची एक लोकप्रिय योजना असून या अंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचा लाभ दिला जात आहे.
मात्र हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकमुस्त मिळत नाहीत. दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या योजनेअंतर्गत पैशांचे वितरण केले जात आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना एकूण 17 हप्ते मिळाले आहेत.
येत्या काही दिवसांनी या योजनेचा अठरावा हप्ता देखील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर होणार आहे. दुसरीकडे केंद्राच्या याच लोकप्रिय योजनेच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्रात देखील अशीच योजना सुरू करण्यात आली आहे. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना असे या योजनेचे नाव आहे.
ही योजना राज्यातील शिंदे सरकारने सुरू केली आहे. या योजनेचे स्वरूप देखील पीएम किसान योजनेप्रमाणेच आहे. म्हणजे या योजनेसाठी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना देखील पीएम किसान प्रमाणे सहा हजार रुपये मिळत आहेत.
याचे वितरण देखील पीएम किसान प्रमाणेचं दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे होत आहे. अर्थातच महाराष्ट्र राज्यातील पी एम किसान साठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान चे 6000 आणि नमो शेतकरीचे 6000 असे एकूण 12000 रुपये मिळतात.
एकीकडे पीएम किसानचे आत्तापर्यंत 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत तर दुसरीकडे अलीकडे सुरू झालेल्या नमो शेतकरीचे एकूण तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत.
खरेतर जेव्हा पीएम किसानचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला त्याचवेळी नमो शेतकरीचा चौथा हप्ता देखील जमा होईल असे बोलले जात होते. मात्र तसे काही होऊ शकले नाही.
परंतु येत्या काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. अशा परिस्थितीत, राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार शेतकऱ्यांना मोठी भेट देणार अशी शक्यता आहे. शिंदे सरकार लवकरच या योजनेचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहे.
जुलै महिन्याच्या अखेरीस किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
तथापि, या संदर्भात सरकारच्या माध्यमातून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यामुळे या योजनेचा चौथा हप्ता कधी मिळतो हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.