Namo Shetkari Yojana News : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाचा लाभ दिला जातो. नमो शेतकरी योजनेअंतर्गत देखील राज्यातील शेतकऱ्यांना सहा हजाराचा लाभ मिळतो.
म्हणजेच महाराष्ट्रातील पीएम किसान च्या पात्र शेतकऱ्यांना पीएम किसानचे 6000 आणि नमो शेतकऱ्याचे 6000 असे एकूण 12000 रुपये मिळतात. आतापर्यंत पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना एकूण 17 हप्ते वितरित करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे लवकरच 18 वा हफ्ता देखील दिला जाणार आहे. ऑक्टोबर महिन्यात हा अठरावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचे फक्त तीनच हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत.
त्यामुळे शेतकरी बांधव नमो शेतकरीच्या पुढील हफ्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता एकाच वेळी शेतकऱ्यांना मिळाला होता.
नमो शेतकरी चा दुसरा आणि तिसरा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला. म्हणजेच आता नमो शेतकरीचा हफ्ता मिळून तब्बल साडेपाच महिन्यांचा काळ पूर्ण झाला आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून चौथ्या हप्त्याविषयी विचारणा होऊ लागली आहे. अशातच आगामी चौथा हप्ता संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पुढील चौथा हप्ता हा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर विधानसभा निवडणुकीच्या आधीच जमा केला जाणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे.
विधानसभा निवडणुकांसाठी ऑक्टोबर महिन्यात आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता शक्यता वर्तवली जात आहे.
यामुळे ही आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता पात्र शेतकऱ्यांचा खात्यावर जमा होईल असे म्हटले जात आहे. तथापि, नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत जमा होणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.