Namo Shetkari Yojana : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी कायमच नवनवीन योजना सुरू केल्या जातात. राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारावे, त्यांना शेतीमधून चांगले उत्पादन मिळवता यावे यासाठी राज्य शासन नवनवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करते.
केंद्र शासन देखील देशभरातील शेतकऱ्यांसाठी विविध नाविन्यपूर्ण योजना राबवत आहे. यामध्ये पीएम किसान योजना ही केंद्राची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात आहेत. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे एका वर्षात तीन हप्ते दिले जात आहेत.
आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 14 हप्ते पात्र शेतकऱ्यांना मिळाले असून दिवाळीपूर्वी या योजनेचा पंधरावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल असा आशावाद आता व्यक्त केला जाऊ लागला आहे. ही योजना देशभरातील शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय असून यामुळे देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.
दरम्यान या योजनेची लोकप्रियता पाहता आणि शेतकऱ्यांना होणारा फायदा पाहता राज्य शासनाच्या माध्यमातून पीएम किसान योजनेप्रमाणे राज्यात नमो शेतकरी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही राज्य शासनाने नुकतीच जाहीर केलेली एक महत्त्वाची योजना आहे.
या योजनेअंतर्गत पीएम किसान योजनेप्रमाणे दरवर्षी सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. हे सहा हजार रुपये देखील राज्यातील शेतकऱ्यांना तीन हप्त्यात वितरित होणार आहेत. म्हणजेच आता राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी पीएम किसान चे सहा हजार आणि नमो शेतकरी चे 6000 असे एकूण बारा हजार रुपये मिळणार आहेत.
खरंतर पी एम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी चा पहिला हप्ता दिला जाणार असे सांगितले जात होते. मात्र या नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता अजूनही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे हा हप्ता केव्हा मिळणार याबाबत शेतकऱ्यांकडून विचारणा केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या योजनेसाठी शासनाने निधीची उपलब्धता करून दिली आहे. मात्र अद्याप या योजनेचा पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर केव्हा जमा होणार याबाबत शासनाकडून कोणतीच अधिकारी माहिती आहे देण्यात आलेली नाही.
पण या योजनेचे राज्यात किती लाभार्थी असतील याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच एक महत्त्वाची माहिती दिली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत केंद्राच्या ६ हजार रुपयांमध्ये राज्यातर्फे ६ हजार रुपयाची भर टाकण्यात आली आहे. आता दरवर्षी १२ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
तसेच नमो शेतकरी योजनेचा राज्यातील १.१५ कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ मिळणार असल्याची महत्त्वाची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांना मिळत आहे त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा लाभ मिळणार आहे.