Namo Shetkari Yojana : 2019 मध्ये वर्तमान मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ केला. तेव्हापासून ही योजना अविरतपणे सुरू असून दर चार महिन्यांनी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचा लाभ दिला जात आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की पी एम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपये मिळतात. हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे वितरित होतात. आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 14 हप्ते पात्र शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत.
तसेच आगामी पंधरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना दिला जाणार असल्याचे वृत्त देखील समोर आले आहे. पी एम किसान योजना ही केंद्रशासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेने राबवली जात आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत पुरवली जात असल्याने ही योजना अल्पावधीतच शेतकऱ्यांच्या पसंतीस खरी उतरली आहे. ही योजना शेतकऱ्यांमध्ये खूपच लोकप्रिय बनली आहे. हेच कारण आहे की, महाराष्ट्र राज्य शासनाने पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केली आहे.
या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावातील आणि आडनावातील पहिले अक्षर घेऊन नाव देण्यात आले आहे. खरंतर या योजनेची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाली आहे. या योजनेअंतर्गत आता राज्यातील पीएम किसान योजनेसाठी पात्र ठरलेल्या 86.60 लाख शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जाणार आहेत.
हे सहा हजार रुपये दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे एकूण तीन हप्त्यात वितरित होणार आहेत. म्हणजेच या योजनेचे स्वरूप पीएम किसान योजनेप्रमाणेच राहणार आहे. यासाठीचे निकष आणि पात्रता देखील पीएम किसान प्रमाणेच आहेत.
दरम्यान राज्यातील या नमो शेतकरीसाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे. या योजनेसाठी 4,000 कोटी रुपयांची तरतूद महाराष्ट्र राज्य शासनाने केली आहे. विशेष बाब म्हणजे पीएम किसानच्या चौदाव्या हफ्त्यासोबतच या योजनेचा पहिला हप्ता दिला जाणार होता. मात्र, हे काही शक्य झाले नाही.
यामुळे सध्या नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता केव्हा मिळणार अशी विचारणा शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नमो शेतकरीचा पहिला हप्ता हा टेक्निकल इशूमुळे रखडला आहे. मात्र हा टेक्निकल इशू लवकरात लवकर सोडवण्यासाठी महाआयटी युद्धपातळीवर काम करत आहे.
महाआयटी या योजनेसाठी आलेला टेक्निकल इशू येत्या काही दिवसात दुरुस्त करणार असल्याचा दावा केला जात असून या योजनेचा पहिला हप्ता हा या चालू ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होऊ शकतो अशी शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.