Namo Shetkari Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. अशीच एक योजना आहे पी एम किसान सन्मान निधी योजना. ही योजना केंद्रीय पुरस्कृत आहे. केंद्रातील मोदी सरकारने 2019 मध्ये या योजनेची सुरूवात केली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ मिळत आहे.
मात्र हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकरकमी मिळत नाहीत. दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने या पैशांचे वितरण केले जाते. एका आर्थिक वर्षात या योजनेअंतर्गत तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात.
आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर सतरा हप्ते जमा झालेले आहेत. दरम्यान केंद्राच्या याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केली आहे.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात. म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान चे 6000 आणि नमो शेतकरीचे 6000 असे एकूण 12 हजार रुपये मिळतात. जें शेतकरी पीएम किसान साठी पात्र आहेत तेच शेतकरी नमो शेतकरी साठी पात्र ठरतात.
नमो शेतकरी चे सर्व नियम, निकष आणि स्वरूप हे पीएम किसान योजनेसारखेच आहे. म्हणजेच नमो शेतकरी योजनेअंतर्गत देखील दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने पैशांचे वितरण केले जाते.
नमो शेतकरी योजनेबाबत बोलायचं झालं तर या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन हप्ते वर्ग करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे दुसरा आणि तिसरा हप्ता एकाच वेळी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता.
ज्यावेळी पीएम किसानचा सोळावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला त्याच दिवशी नमो शेतकरीचा दुसरा आणि तिसरा हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळाला. दरम्यान, आता या योजनेच्या पुढील हफ्त्याची आतुरता लागली आहे.
पीएम किसान योजनेचा 17 वा हफ्ता मिळून आता बरेच दिवस उलटले असल्याने आता नमो शेतकरीच्या चौथ्या हफ्त्याबाबत उत्सुकता वाढली आहे. दरम्यान याच संदर्भात आता एक मोठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन राज्यातील शिंदे सरकार नमो शेतकरी च्या पात्र शेतकऱ्यांना लवकरच या योजनेचा पुढील हप्ता देणार आहे.
नमो शेतकरीचा पुढील चौथा हप्ता हा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जुलै महिन्याच्या अखेरीस जमा होणार आहे. 31 जुलै पर्यंत या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.