Nagpur Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागातून धावणाऱ्या सहा एक्सप्रेस गाड्यांच्या मार्गात बदल करण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे रेल्वेचा प्रवास सुरू करण्याआधी प्रवाशांनी या बदलाविषयी माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.
खरे तर रेल्वे हे मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांसाठी प्रवासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. सर्वसामान्य नेहमीच रेल्वेने प्रवास करण्याला पसंती दाखवतात. याचे कारण म्हणजे भारताचे रेल्वे नेटवर्क हे कानाकोपऱ्यात पसरलेले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न देखील झाले आहेत. रेल्वे मधील प्रवाशांना विविध सोयी सुविधा देखील पुरवल्या जात आहेत. शिवाय रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणार आहे.
हेच कारण आहे की आपल्या देशात इतर प्रवासी साधनांच्या तुलनेत रेल्वेने प्रवास करण्याला विशेष पसंती दाखवली जात आहे.
अशातच प्रवाशांचा प्रवास गतिमान व्हावा म्हणून दक्षिण-मध्य रेल्वेतर्फे वारंगल, सुररेड्डीपलेम आणि ओंगोल स्थानकांवर तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे.
यासाठी नॉन इंटरलॉकिंग आणि यार्ड रिमोल्डिंगचे काम केले जाणार आहे. दरम्यान या कामांसाठी काही रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल करण्याचा निर्णय झाला आहे.
आता आपण या कामांमुळे कोणत्या रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे आणि या गाड्या कोणत्या मार्गे धावणार याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.
विशाखापट्टणम नवी दिल्ली एक्स्प्रेस आणि नवी दिल्ली- विशाखापट्टणम एक्स्प्रेसचे ९ ते १७ डिसेंबरदरम्यान, विशाखापट्टणम – गांधीधाम एक्स्प्रेसचे ७ ते १४ डिसेंबर, गांधीधाम- विशाखापट्टण एक्स्प्रेसचे १० ते १७ डिसेंबरदरम्यान, पुरी- ओखा एक्स्प्रेसचे १० ते १७ डिसेंबर आणि ओखा-पुरी एक्स्प्रेसचे ६ ते १२ डिसेंबदरम्यानच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
या सहा गाड्या आता विजयनगरम जंक्शन, रायगढा, टिटलागढ जंक्शन, रायपूर, नागपूर मार्गे धावणार आहेत. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने याबाबत माहिती दिली आहे.
तसेच या गाड्यांच्या वेळापत्रकात झालेल्या बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यायची आहे आणि यानुसार प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करायचे आहे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.