Nagar News : महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मंडळी राज्यातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांमध्ये विविध नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला आहे. नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली असून यामुळे शेतकरी बांधव कर्जबाजारी झाले आहेत. दरम्यान याच नैसर्गिक संकटांमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई मंजूर केली जाते.
दरम्यान याच नुकसान भरपाईच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाने 535 कोटी 65 लाख 74 हजार 893 रुपयांची नुकसान भरपाई वितरित केलेली आहे.
या नुकसान भरपाईचा लाभ राज्यातील पाच लाख तीस हजार 45 शेतकऱ्यांना मिळाला असल्याची माहिती कृषी विभागाकडून समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील या नुकसान भरपाईचा लाभ मिळाला असून यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
मंत्री महोदयांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील पाच लाखाहून अधिक शेतकऱ्यांना 535 कोटी रुपयांचा लाभ या ठिकाणी देण्यात आला आहे. महत्वाचे बाब म्हणजे शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेली नुकसान भरपाईची ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून वर्ग करण्यात आली असून यामुळे शेतकऱ्यांना लवकर लाभ मिळाला आहे.
यात अहिल्यानगर जिल्ह्यातील २ हजार ९७५ शेतकऱ्यांना २ कोटी ५४ लाख ६५ हजार ९७० रुपये मिळाले आहेत. आता आपण नाशिक विभागातील शेतकऱ्यांना आणि पुणे विभागातील शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळाली या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
नाशिक विभागातील शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळाली?
अहिल्यानगर जिल्ह्यातील २ हजार ९७५ शेतकऱ्यांना २ कोटी ५४ लाख ६५ हजार ९७० रुपये
जळगाव जिल्ह्यातील ४ हजार २७४ शेतकऱ्यांना ५ कोटी ६५ लाख ५५ हजार ७३५ रुपये
नाशिक जिल्ह्यातील ५ हजार ४२ शेतकऱ्यांना ४ कोटी ४३ लाख ९८ हजार ६४२ रुपये
धुळे जिल्ह्यातील ४८३ शेतकऱ्यांना ४६ लाख ८३ हजार ५५१ रुपये
नंदुरबार जिल्ह्यातील १७ शेतकऱ्यांना २ लाख ७८ हजार ४६५ रुपये
पुणे विभागातील शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळाली?
पुणे जिल्ह्यातील ३९० शेतकऱ्यांना ३२ लाख ७४ हजार ४८९ रुपये
सातारा जिल्ह्यातील २७ शेतकऱ्यांना १ लाख १४ हजार ३७६ रुपये
कोल्हापूर जिल्ह्यातील ४३ हजार ३२१ शेतकऱ्यांना ३५ कोटी ८७ लाख १६ हजार ९४ रुपये
सांगली जिल्ह्यातील ५२२ शेतकऱ्यांना ५२ लाख १२ हजार ८०३ रुपये
सोलापूर जिल्ह्यातील ३ हजार १३ शेतकऱ्यांना ४ कोटी २५ लाख ४ हजार २८७ रुपये