Mushroom Farming : गेल्या काही वर्षांत भारतात मशरूमची (Mushroom Crop) खपत लई वाढली आहे. आता आपल्या स्वयंपाकघरात मशरूमची भाजी मोठ्या प्रमाणात बनवली जात आहे. याची मागणी आपल्या महाराष्ट्रात देखील झपाट्याने वाढली आहे.
चवीला ते जितके स्वादिष्ट आहे तितकेच ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते. विशेषतः शाकाहारी लोकांसाठी याला ‘सुपर फूड’ देखील म्हणता येईल. प्रथिने, फायबर, खनिजे भरपूर असलेले मशरूम सर्व वयोगटातील लोकांना आवडतात. अशा परिस्थितीत त्याची मागणी आगामी काही दिवसात अजूनच वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.
अशा परिस्थितीत मशरूम लागवड (Farming) शेतकऱ्यांसाठी (Farmer) विशेष फायद्याची ठरत आहे. शेतकरी मित्रांनो तुम्हीदेखील मशरूमची शेती करण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी विशेष तुमच्या साठीच आहे. मित्रांनो आज आपण भारतात उत्पादित केल्या जाणाऱ्या मशरूमच्या काही जातींची (Mushroom Variety) माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊ या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
मीडिया रिपोर्टनुसार, जगभरात मशरूमच्या 2000 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात, त्यापैकी फक्त काही खाण्यासाठी सुरक्षित आहेत. भारतातही मशरूमच्या अनेक प्रजाती आढळतात आणि त्यांच्या वाढत्या मागणीमुळे देशभरात अनेक ठिकाणी त्याची लागवड केली जाते. आपल्या महाराष्ट्रात देखील याची लागवड केली जाते. चला तर मग जाणून घेऊया आपल्या देशात आढळणाऱ्या मशरूमच्या काही लोकप्रिय जातींबद्दल.
मशरूमचे प्रकार भारतात आढळतात
बटन मशरूम:- भारतात सर्वात जास्त या प्रजातीची लागवड केली जाते. व्हाईट बटन मशरूम ही मशरूमची एक सुधारित जात आहे. या जातीच्या मशरूमला स्वतःची सौम्य चव आहे आणि त्यात क्रीमयुक्त पोत आहे. पिझ्झापासून ते भाजीपर्यंत याचा भरपूर वापर केला जातो. तुम्ही ते हलके वाफवून खाऊ शकता आणि कच्चे देखील खाऊ शकता. अशा परिस्थितीत या मशरूमला भारतात मोठी मागणी आहे. यामुळे शेतकरी बांधव या जातीच्या मशरूमची मोठ्या प्रमाणात शेती करत असतात. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव देखील या जातीच्या मशरूमची लागवड करतात.
ऑयस्टर मशरूम :- ऑयस्टर मशरूमला भारतात गेल्या कित्येक वर्षांपासून उत्पादित केले जात आहे. या मशरूमला भारतात मोठी मागणी आहे. हिंदीत या मशरूमला धिंगरी या नावाने ओळखले जाते. हे पंख्यासारखे दिसते आणि धुळीचा रंग आहे. हे शिंपल्यासारखे दिसते, म्हणून ते या नावाने ओळखले जाते. त्याची लागवड मध्य प्रदेश, बंगाल, ओडिशा, कर्नाटक, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जाते. या जातीच्या मशरूम लागवडीतून शेतकरी बांधव चांगला बक्कळ पैसा (Farmer Income) कमवत आहे.
मिल्की मशरूम :- मिल्की मशरूमला समर मशरूम असेही म्हणतात. हे बटन मशरूमसारखे दिसते, जे की बटन मशरूम पेक्षा जास्त काळ टिकते. भारतातील कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. तथापि, या राज्यात देखील याची एवढी लागवड केली जात नाही. हा व्हिटॅमिन डीचा उत्कृष्ट स्रोत आहे. मशरूम उत्पादक शेतकरी या जातीची देखील मोठ्या प्रमाणात शेती करत आहेत.
क्रेमिनी मशरूम :- या जातीचे मशरूम बटन मशरूमची एक प्रजाती आहे. त्यावर त्वचेचा थर असतो जो कॉफी रंगाचा असतो. चव आणि टेक्चरच्या दृष्टीने ते अधिक चविष्ट आहे. या जातीची देखील अलीकडे मशरूम उत्पादक शेतकरी लागवड करत आहेत. मात्र असे असले तरी या जातीची लागवड आपल्या भारतात खूपच कमी प्रमाणात बघायला मिळते.