Mushroom Farming : देशातील शेतकरी बांधव (Farmer) आता उत्पन्नवाढीच्या (Farmer Income) अनुषंगाने शेतीमध्ये बदल करत आहे. आपले उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकरी बांधव आता नवनवीन नगदी पिकांची (Cash Crop) शेती (Farming) करू लागला आहे.
शेतकरी बांधव आता आपल्या शेतात अशी पिके लावतो ज्याच्या माध्यमातून त्याला कमी कालावधीत चांगले उत्पन्न मिळू शकेल. जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना आता पीकपद्धतीत तसेच पारंपरिक शेतीपद्धतीला वगळून बाजारात कायम मागणी मध्ये असलेल्या पिकांची आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा सल्ला देत आहेत. मित्रांनो मशरूम (Mushroom Crop) हे देखील पीक आहे ज्याची बाजारात सदैव मागणी असते.
अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना मशरूम शेतीतून चांगली कमाई होत आहे. मात्र असे असले तरीही आज आपण मशरूमच्या अशा एका विशिष्ट जाती विषयी जाणून घेणार आहोत ज्याच्या शेतीतून शेतकऱ्यांना करोडो रुपये कमावण्याची देखील संधी निर्माण होऊ शकते. मित्रांनो आज आपण ब्लू ओयस्टर मशरूम (blue oyster mushroom) या मशरूमच्या जातीच्या (Mushroom Variety) शेती विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
ब्लू ऑयस्टर मशरूमची शेती कशी करणार बर…!
मित्रांनो तुम्हालाही कमी खर्चात जास्त नफा हवा असेल तर मशरूम शेती तुमच्यासाठी एक चांगला पर्याय सिद्ध होऊ शकते. आणि जर तुम्ही मशरूम शेती करू इच्छित असाल तर निश्चितच तुमच्यासाठी ब्लू ऑयस्टर मशरूम हा एक चांगला पर्याय ठरु शकतो. मित्रांनो जाणकार लोकांच्या मते, शेतकरी बांधवांना या विशिष्ट जातीच्या मशरूम लागवडीसाठी जास्त खर्च करण्याची देखील आवश्यकता नसते.
एवढेच नाही तर ब्ल्यू आयस्टर मशरूम वाढविण्यासाठी कोणत्याही विशेष पद्धतीचा अवलंब करण्याची देखील गरज भासत नाही. यामुळे इतर जातींच्या मशरूमच्या तुलनेत ब्लु ऑयस्टर मशरूम शेती सोपी आहे. शेतकरी बांधव या मशरूमची शेती इतर मशरूम शेतीप्रमाणे करू शकणार आहेत.
जाणकार लोक ब्ल्यू आयस्टर मशरूम शेतीबद्दल अधिक माहिती देताना सांगतात की, शेतकरी बांधव सोयाबीन बगॅस, गव्हाचा पेंढा, भाताचा पेंढा, मक्याचे देठ, तूर, तीळ, बाजरी, उसाचे बगासे, मोहरीचा पेंढा, कागदाचा कचरा, पुठ्ठा, लाकूड भुसा यासारख्या कृषी टाकाऊ पदार्थांमध्ये हे मशरूम सहज वाढवू शकतात.
या मशरूमची शेती सुरू करण्यासाठी शेतकरी बांधवांना पॉलिथिन पिशवीत हा कंपोस्ट व्यवस्थित भरून मशरूम शेती साठी तयार करावा लागेल व नंतर सर्व पिशव्यांचे तोंड बांधावे लागतील. यानंतर, त्या सर्व पिशव्यांमध्ये 10 ते 15 छिद्रे करावे लागतील आणि शेवटी, त्यांना एका काळोख असलेल्या खोलीत बंद करावे लागेल.
ब्लु ऑयस्टर मशरूमच्या शेतीतून किती नफा मिळणार बर…!
या प्रक्रियेनंतर सर्व तयार केलेल्या पिशव्यांमध्ये 15 ते 17 दिवसांत बुरशीचा सापळा तयार होतो आणि त्यानंतर 23 ते 24 दिवसांनी तुम्हाला यातून चांगल्या प्रतीचे मशरूम तयार मिळणार आहे. निश्चितच अवघ्या एका महिन्यात शेतकरी बांधवांना मशरूमच्या या जातीतून उत्पन्न मिळण्यास सुरुवात होणार आहे.
मित्रांनो आम्ही तुमच्या माहितीसाठी येथे नमूद करू इच्छितो की हे मशरूम बाजारात सुमारे 150-200 रुपये प्रति किलो दराने विकले जातात. अशा परिस्थितीत, त्याच्या लागवडीतून चांगली कमाई करून तुम्ही काही दिवसातच करोडपती बनू शकणार आहात.