Mushroom Farming : देशात अलीकडे शेतकरी बांधव (Farmer) पीकपद्धतीत मोठा बदल करत आहेत. आता आपल्या देशात मशरूम शेतीचा नवा ट्रेंड बघायला मिळत आहे. आता शेतकऱ्यांमध्ये मशरूम (Mushroom Crop) शेती (Farming) मोठी प्रचलित झाली असून याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
मशरूम शेतीची (Agriculture) सर्वात मोठी विशेषता म्हणजे कमी खर्चात आणि कमी जागेत या पिकाची लागवड आता सहज करता येत आहे. यामुळे अल्प कालावधीतच चांगला नफा शेतकऱ्यांना मिळू लागला आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, पूर्वी फक्त डोंगराळ भागात मशरूमची शेती केली जात होती. आधी डोंगराळ भागात असलेले हवामान मशरूमच्या लागवडीसाठी सर्वात योग्य मानले जात असे.
पण आता शेतीचे नवीन तंत्र बाजारात दाखल झाले असून मशरूम शेती आता कुठेही करता येणे शक्य झाले आहे. मशरूम शेती दाखल झालेल्या नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने आता मशरूमची लागवड मैदानी भागातही सुरू झाली आहे.
मित्रांनो अशा परिस्थितीत आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी मशरूमच्या एका सुधारित जातीची माहिती घेऊन हजर झालो आहोत. मित्रांनो आज आपण ब्लू ऑयस्टर मशरूम (Blue Oyster Mushroom) या मशरूमच्या जाती (Mushroom Variety) विषयी जाणून आहोत. ब्ल्यू ऑयस्टर मशरूममध्ये औषधी गुणधर्म अधिक असल्याने याची बाजारात मोठी मागणी असते. अशा परिस्थितीत या मशरूमची शेती शेतकऱ्यांना बक्कळ पैसा मिळवून देत आहे.
हे मशरूम अशा प्रकारे उत्पादीत केले जाते बर
मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लू ऑयस्टर मशरूमची लागवड देखील इतर मशरूमप्रमाणेच केली जात आहे. यासाठी कोणत्याही विशेष तंत्रज्ञानाची आवश्यकता नाही.
सोयाबीन बगॅस, गव्हाचा पेंढा, भाताचा पेंढा, मक्याचे देठ, तूर, तीळ, बाजरी, उसाची बगासे, मोहरीचा पेंढा, कागदाचा कचरा, पुठ्ठा, लाकूड भुसा यांसारख्या कृषी टाकाऊ पदार्थांच्या उपयोग करून मशरूमच्या या जातीची शेती केली जाते. त्याच्या लागवडीसाठी, पेंढा पॉलिथिनच्या पिशवीत भरून पेरणी (स्पॉनिंग) केली जाते आणि पिशवीचे तोंड बांधून त्यात 10-15 छिद्रे केली जातात. त्यानंतर त्याला अंधाऱ्या खोलीत ठेवले जाते.
ब्लू ऑयस्टर मशरूम शेतीतून करोडपती बनू शकतात
मशरूम बीज लागवड केल्यानंतर प्लॅस्टिकच्या पिशवीत 17 दिवसांनी बुरशीचा सापळा पूर्णपणे पसरतो. मशरूम सुमारे 23-24 दिवसांनी तोडता येतात. हे मशरूम बाजारात 150 ते 200 रुपये किलो दराने विकले जातात. अशा परिस्थितीत तुमचे मशरूम उत्पादनाचे युनिट जितके मोठे असेल तितका तुमचा नफा वाढेल.
केवळ मशरूमची लागवड करून लाखोंचा नफा कमावणाऱ्या शेतकऱ्यांचीही अनेक उदाहरणे आहेत. निश्चितच या जातीच्या मशरूमची शेती शेतकऱ्यांना बक्कळ पैसा कमवून देणार आहे. मात्र असे असले तरी जाणकार लोक मशरूम शेती सुरू करण्याआधी शेतकरी बांधवांना प्रशिक्षण घेण्याचा सल्ला देत असतात.