Mumbai Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजधानी मुंबई सह पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि खानदेश मध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. काल राज्यातील काही भागात मात्र पावसाने उघडीप दिली. मात्र असे असले तरी विदर्भातील काही जिल्ह्यात आणि राजधानी मुंबईमध्ये अन ठाण्यात पाऊस कोसळला आहे.
आज मंगळवारी सकाळपासूनच मुंबई मुंबई उपनगर आणि ठाण्यात पाऊस सुरू आहे. पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. रात्रीपासून सुरू झालेला हा पाऊस सकाळी देखील सुरूच होता. यामुळे कामाला निघालेल्या चाकरमान्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. शहरात वाहतूक कोंडी देखील या निमित्ताने झाली आहे. वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असल्याने नागरिकांना मोठा फटका बसत आहे.
हे पण वाचा :- कापसाच्या दरात मोठी घसरण ! आता दरवाढ होणार का? पहा याविषयी तज्ञांचे मत
विजांच्या कडकडाटासह कोसळणारा पाऊस आणि वाहणारा वादळी वारा यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र असे असले तरी रेल्वे सुरळीतपणे सुरू असून थोडाफार विदंब रेल्वे प्रवासात होत आहे. अद्याप रेल्वे वाहतूक व्यवस्थित सुरू असून कुठेच रेल्वे वाहतुकीमध्ये खंड पडल्याची बातमी समोर आलेली नाही.
यामुळे या अवकाळी पावसाच्या काळात ही दिलासा देणारी बातमी आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाकडून पुढील काही तास मुंबई मुंबई उपनगर आणि ठाण्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे चाकरमान्यांना निश्चितच पुढील काही तास तारेवरची कसरत करून प्रवास करावा लागणार आहे.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी दिलासादायक ! शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो मार्ग प्रकल्पाला मिळाली गती; 400 खांब तयार, केव्हा होणार पूर्ण काम?
मुंबई हवामान विभागाने वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात पुढील चार ते पाच तास पावसाचा जोर कायम राहणार आहे. यावेळी विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा वेग वाढलेला राहणार आहे. या भागात जवळपास 30 ते 40 kmphs प्रति तास वेगाने वारे वाहतील असा अंदाज आहे.
यामुळे मुंबई, रायगड, ठाणे परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याची गरज आहे. एकंदरीत ऐन उन्हाळ्यात मुंबई वासियांना पावसाळ्याची फिलिंग येत आहे. शिवाय पुढील पाच तास मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरात पावसाची शक्यता लक्षात घेता वातावरणात आज दिवसभर गारवा जाणवू शकतो.