Mumbai Vande Bharat Train : तुम्हीही देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राच्या राज्य राजधानी मुंबईचे रहिवासी आहात का ? हो, मग तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. ती म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना खुश करण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
मायानगरी मुंबईला आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. सध्या स्थितीला राजधानी मुंबईहुन पाच वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव या 5 मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
विशेष म्हणजे उद्या अर्थातच 12 मार्च 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईला आणखी एका वंदे भारत ट्रेनची सप्रेम भेट देणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील दहा नवीन वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण केले जाणार आहे.
यात राजधानी मुंबईला देखील एक गाडीची भेट मिळणार आहे. तसेच पुण्याला देखील दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट दिली जाणार आहे. म्हणजेच महाराष्ट्राला एकूण तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस यावेळी दिली जाणार आहे. अशा परिस्थितीत आता आपण या तिन्ही वंदे भारत एक्सप्रेसचे रूट थोडक्यात समजून घेणार आहोत.
कसे राहणार रूट ?
मीडिया रिपोर्टनुसार, उद्या पंतप्रधान मोदी 10 नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करणार आहेत. यातील तीन गाड्या आपल्या महाराष्ट्राला मिळतील. पुणे ते बडोदा, पुणे ते सिकंदराबाद आणि मुंबई ते अहमदाबाद या मार्गांवर नवीन वंदे भारत सुरू होणार आहेत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या स्थितीला मुंबई सेंट्रल ते गांधीनगर यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे. ही गाडी अहमदाबाद मार्गेच धावत आहे.
या गाडीला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दाखवला असल्याने आता या मार्गावर दुसरी गाडी सुरू होणार आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान ही गाडी चालवली जाणार असून उद्यापासून या गाडीचे संचालन सुरू होईल अशी माहिती समोर आली आहे.
मुंबई-अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक
अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल दरम्यान चालवली जाणारी वंदे भारत ट्रेन ही ट्रेन रविवारी धावणार नाही. इतर दिवस ही गाडी अहमदाबादहून सकाळी ०६ वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि ११ वाजून ३५ मिनिटांनी मुंबई सेंट्रलला पोहोचणार आहे.
तसेच मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद Vande Bharat Train मुंबई सेंट्रल येथून दुपारी ०३ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल आणि रात्री ०९ वाजून २५ मिनिटांनी अहमदाबाद रेल्वे स्थानकावर पोहोचणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावर चालवली जाणारी ही हाय स्पीड ट्रेन मार्गातील काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. ही ट्रेन वडोदरा, सुरत, वापी आणि बोरिवली या स्थानकावर थांबणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.