Mumbai Vande Bharat Sleeper Train : रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी गोड बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच वंदे भारत एक्सप्रेसचे स्लीपर वर्जन लॉन्च होणार आहे. पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात वंदे भारत स्लीपर ट्रेन लॉन्च होणार असे खात्रीलायक वृत्त समोर आले आहे.
विशेष म्हणजे देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन आपल्या महाराष्ट्राला मिळणार असा दावा होत आहे. ही गाडी मुंबई ते सिकंदराबाद या मार्गावर चालवली जाणार असे बोलले जात आहे. विशेष म्हणजे मुंबई ते सिकंदराबाद सोबतच मुंबईला आणखी एका स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, उत्तर रेल्वेच्या मुरादाबाद विभागाला येत्या तीन ते चार महिन्यात स्लीपर वंदे भारत मिळणार आहे. ही वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस बरेली ते मुंबई दरम्यान चालवली जाणार आहे.
यासाठी बरेली आणि मुंबई दरम्यानचे वेगवेगळे रेल्वे विभाग सर्वेक्षण करत आहेत आणि अहवाल तयार करत आहेत. सर्वेक्षणाचा अहवाल रेल्वे बोर्डाकडे पाठवला जाईल. यानंतर या लक्झरी ट्रेनचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाईल, अशी माहिती समोर आली आहे.
कसा राहणार रूट ?
14 जुलै 2024 ला रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान, बरेली-मुंबई दरम्यान वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस चालवण्याबाबत मुरादाबाद आणि इज्जतनगर विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, येत्या दोन ते तीन महिन्यांत मुरादाबाद विभागातील पहिली वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस बरेली आणि मुंबई दरम्यान सुरू केली जाईल.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मुंबई ते बरेली हा जवळपास १६०० किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग आहे. या सोळाशे किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार आहे. त्यासाठी सध्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सुरू आहे.
पण ही गाडी बरेली-चंदौसी-अलिगड-आग्रा-ग्वाल्हेर-झाशी-बिना-भोपाळ-इटारसी-खंडवा-जळगाव-मनमाड-मुंबई अशी चालवली जाणार आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर याबाबतचा रिपोर्ट रेल्वे बोर्डाकडे सादर होणार आहे.
पुण्यालाही मिळणार वंदे भारत स्लीपर ट्रेन
विशेष बाब अशी की मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने देखील वंदे भारत स्लीपर ट्रेनचा एक प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सुपूर्द केला आहे. नागपूर विभागाने नागपूर ते पुणे दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवली गेली पाहिजे या मागणीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. जर या प्रस्तावावर रेल्वे बोर्डाकडून हिरवी झेंडी मिळाली तर या मार्गावर देखील ही गाडी चालवली जाणार आहे.