Mumbai Vande Bharat Express : मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी आहे. दरम्यान मुंबई शहरातील रहिवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. वास्तविक आज पासून देशात नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे.
पुढील महिन्यात दिवाळीचा सण साजरा होणार आहे. अशा या सणासुदीच्या दिवसात मुंबईकरांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. सणासुदीच्या दिवसात केंद्र शासनाकडून मुंबई शहराला एक मोठी भेट मिळणार आहे. ती म्हणजे मुंबईला आणखी दोन वंदे भारत एक्सप्रेस दिल्या जाणार आहेत.
खरंतर, सध्या स्थितीला राजधानीहुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर या चार वंदे भारत सूरु आहेत.
मात्र आता ही संख्या लवकरच सहा एवढी होणार आहे. कारण की रेल्वे मंत्रालयाकडून आर्थिक राजधानीहुन आणखी दोन वंदे भारत एक्सप्रेस चालवल्या जाणार आहेत.
कोणत्या मार्गांवर धावणार ?
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे मंत्रालय देशातील नऊ महत्त्वाच्या मार्गावर दिवाळीला वंदे भारत एक्सप्रेस चालवणार आहे. यापैकी तीन वंदे भारत एक्सप्रेस मध्य रेल्वेला मिळणार आहेत. विशेष म्हणजे सेंट्रल रेल्वेला दिल्या जाणाऱ्या या वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते जालना, मुंबई ते कोल्हापूर आणि पुणे ते सिकंदराबाद या तीन मार्गावर चालवल्या जाणार आहेत.
दरम्यान, याबाबत रेल्वेकडून कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही परंतु या तीन मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होऊ शकते असे सांगितले जात आहे. सध्या स्थितीला देशातील एकूण 34 महत्त्वाच्या मार्गावर ही हायस्पीड ट्रेन सुरू आहे. यापैकी सहा मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत.
मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते गोवा, मुंबई ते गांधीनगर, नागपूर ते बुलासपूर आणि इंदोर ते नागपूर या राज्यातील महत्त्वाच्या मार्गावर ही हायस्पीड ट्रेन सध्या स्थितीला सुरू आहे. दरम्यान आता राज्याला आणखी 3 नवीन वंदे भारतची भेट मिळणार आहे. यामुळे महाराष्ट्रातून धावणाऱ्या वंदे भारतची संख्या लवकरच वाढणार असा आशावाद व्यक्त होत आहे.