Mumbai Vande Bharat Express : गेल्या काही वर्षांपासून देशात वंदे भारत एक्सप्रेसच्या विशेष चर्चा रंगल्या आहेत. या गाडीचा कमाल वेग आणि या ट्रेनमध्ये देण्यात आलेल्या वर्ड क्लास सोयी सुविधा या सर्व पार्श्वभूमीवर ही गाडी रेल्वे प्रवाशांमध्ये लोकप्रिय बनली आहे.
2019 मध्ये सर्वप्रथम ही गाडी रुळावर धावली होती. तेव्हापासून आतापर्यंत देशातील 34 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरु झाली आहे. आपल्या राज्याला सुद्धा वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे.
आतापर्यंत राज्याला सहा वंदे भारत ट्रेन मिळाल्या आहेत. अशातच आता राज्याला आणखी एक वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार असे वृत्त समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राजधानी मुंबईला लवकरच आणखी एका हाय स्पीड ट्रेनची भेट मिळेल. यामुळे मुंबईकरांचा प्रवासा आणखी गतिमान होणार आहे.
दरम्यान आता आपण ही मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन कोणत्या मार्गावर सुरू होणार आहे? याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या मार्गावर सुरू होणार
मीडिया रिपोर्टनुसार, राजधानी मुंबई ते जालना दरम्यान लवकरच वंदे भारत ट्रेन सुरू होऊ शकते. सध्या स्थितीला या संभाव्य हाय स्पीड ट्रेनसाठी तिकीट दर ठरवण्याचे काम सुरू आहे.
यामुळे या मार्गावर लवकरच ही गाडी धावणार असा आशावाद व्यक्त होत आहे. पण, रेल्वेच्या माध्यमातून या संदर्भात कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र एका प्रतिष्ठित वृत्त संस्थेने याबाबत वृत्त प्रकाशित केले आहे.
सध्या महाराष्ट्रातील कोणत्या मार्गावर सुरू आहे वंदे भारत?
सध्या स्थितीला राज्यातील सहामार्गांवर ही ट्रेन चालवली जात आहे. राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मडगाव, इंदोर ते नागपूर या मार्गावर ही गाडी सुरू आहे.
मुंबईला मिळणार 5 वी वंदे भारत
सध्या राजधानी मुंबईहून चार वंदे भारत एक्सप्रेस चालवल्या जात आहेत. मात्र आता लवकरच आणखी एका गाडीची भेट मिळणार आहे. यामुळे ही संख्या पाच एवढी होणार आहे.
मुंबई ते जालना या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू झाली तर या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास गतिमान होणार आहे. यामुळे जालना सहित संपूर्ण मराठवाड्यातील जनतेला मोठा दिलासा मिळणार असा आशावाद व्यक्त होत आहे.