Mumbai Vande Bharat Express : देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याची राज्य राजधानी मुंबई येथील रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी अपडेट हाती आली आहे. मुंबईहून धावणाऱ्या एका महत्त्वाच्या वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. सध्या महाराष्ट्रात आठ वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत.
यातील सहा गाड्या या राजधानी मुंबईला मिळाल्या आहेत. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद आणि मुंबई सेंट्रल ते गांधीनगर यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत.
याशिवाय उपराजधानी नागपूरला दोन गाड्या मिळाल्या आहेत. नागपूर ते मडगाव आणि नागपूर ते इंदोर या मार्गांवर या दोन्ही गाड्या सुरू आहेत. दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावर सुरू असणाऱ्या मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम रेल्वे तर्फे चालवल्या जाणाऱ्या गाडी क्रमांक 22961 अर्थातच मुंबई सेंट्रल-अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक पुढील महिन्यात बदलले जाणार आहे. नवीन वेळापत्रक 24 ऑगस्ट पासून लागू केले जाणार आहे.
अशा परिस्थितीत मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या वंदे भारत एक्सप्रेस ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हे नवीन वेळापत्रक माहिती असणे गरजेचे आहे. यामुळे आता आपण हे वेळापत्रक थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कसं असणार नवीन वेळापत्रक ?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की 24 ऑगस्ट 2024 पासून मुंबई सेंट्रल येथून ही वंदे भारत एक्स्प्रेस दुपारी ३:४५ वाजता सुटणार आहे आणि अहमदाबाद येथे रात्री सव्वा नऊ वाजता पोहोचणार आहे.
मुंबई सेंट्रल येथून सुटल्यानंतर ही गाडी बोरिवली येथे दुपारी ४:१० वाजता, वापी येथे सायंकाळी ५:४० वाजता, सुरत येथे सायंकाळी ६.३८ वाजता तर वडोदरा येथे रात्री ८:११ वाजता दाखल होणार आहे. वडोदरानंतर ही गाडी थेट अहमदाबादला पोहोचणार आहे.