Mumbai Traffic News : मुंबई शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी वेगवेगळे रस्ते विकासाची प्रकल्पांची कामे शहरात सुरू आहेत. मुंबई ही राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी. शिवाय हे एक प्रमुख औद्योगिक केंद्र देखील आहे.
शहरात वेगवेगळ्या आर्थिक संस्थांची मुख्यालय वसलेली आहेत. देशातील अग्रगण्य सरकारी संस्थांची हेड ऑफिस मुंबई मध्ये आहेत. याशिवाय अनेक खाजगी कंपन्यांचे मुख्यालय देखील या ठिकाणी वसलेले आहेत. परिणामी मुंबई शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. कामानिमित्त शहरात मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत.
हे पण वाचा :- अवकाळी पाऊस केव्हा घेणार विश्रांती ! पंजाबराव डख यांनी दिली मोठी माहिती, पहा काय म्हटले Punjabrao?
अशा परिस्थितीत शहरात जनतेला चांगली वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. अशातच गेल्या चार वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ असलेला हिमालय पूल पुनर्बांधणीचे काम देखील हाती घेण्यात आले होते. हा पूल दुर्घटनाग्रस्त झाला होता आणि यामध्ये तब्बल सात लोकांनी आपला जीव गमावला होता.
अशा परिस्थितीत या पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय झाला. यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. आता एप्रिल 2023 पासून हा पूल प्रवाशांसाठी खुळा करण्यात आला आहे. मात्र तरीही प्रवासी पुलावरून प्रवास न करता पूलाखालून जीवघेणी क्रॉसिंग करत आहेत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की 2019 मध्ये हा पूल कोसळल्यानंतर महापालिकेकडून मुंबईमधील सर्वच महत्वाच्या पुलांचे ऑडिट करण्यात आले. आणि या ऑडिट नंतर सर्व धोकादायक पूल दुरुस्तीचे तसेच पुनर्बांधणीचे हाती घेण्यात आले. यानुसार, हिमालय पूल 35 मीटर लांब आणि 6 मीटर रुंद, स्टेनलेस स्टीलच्या सहाय्याने बांधण्यात आला आहे. या पुलासाठी जवळपास सात कोटींचा खर्च देखील करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे हा नव्याने तयार करण्यात आलेला पूल पूर्णपणे सुरक्षित असून यासाठी पोलादचा वापर झाला आहे. पुलाच्या स्टेनलेस स्टीलच्या मटेरिअलमुळे खाऱया हवेचा परिणाम होणार नसून गंजण्याचा धोकाही कमी आहे.
विशेष म्हणजे गर्दीच्या वेळी या पुलावर अठरा हजार पादचारी येजा करू शकणार आहेत. मात्र तरीही या पुलाचा बहुतांशी पादचारी प्रवाशांकडून वापर होत नाहीये. यामुळे यासाठी देखील उपाययोजना करणे आवश्यक असून नागरिकांची जीवघेणी क्रॉसिंग वेळेत बंद करणे गरजेचे आहे.