Mumbai To New Mumbai Airport Metro Line : मुंबई शहर आणि उपनगरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये वेगवेगळे रस्ते विकासाचे कामे केली जात आहेत. भुयारी मार्ग, उन्नत मार्ग, सागरी किनारा मार्ग, उड्डाणपूल यांसारखे बहुउद्देशीय प्रकल्प जलद गतीने पूर्ण केले जात आहेत. मेट्रो मार्गाचा विस्तारही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी जलद गतीने सुरू आहे. दरम्यान आता नवी मुंबई विमानतळ येत्या काही महिन्यात सुरु होणार आहे.
अशा परिस्थितीत मुंबई ते नवी मुंबई विमानतळ दरम्यानचा प्रवास सोईस्कर करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून आत्तापासूनच तयारी केली जात आहे. यां पार्श्वभूमीवर आता मुंबई ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्गाने जोडण्यासाठी चाचपणी सुरू झाली आहे. येथील वाहतूक व्यवस्था सुलभ करण्यासाठी मेट्रोचा पर्याय पुढे आला असून Mumbai To New Mumbai Airport पर्यंत म्हणजे जवळपास 35 किलोमीटरचा भुयारी मेट्रोमार्ग प्रकल्प विकसित केला जात आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी खुशखबर ! लंडन आयच्या धर्तीवर ‘मुंबई आय’ प्रकल्प तयार होणार, उंच पाळण्यात बसून पाहता येणार जीवाची मुंबई, पहा……
मिळालेल्या माहितीनुसार यासाठी जवळपास 15000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचे काम सिडको आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून केला जाणार आहे. एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार सिडकोच्या माध्यमातून या प्रकल्पाचे नवी मुंबई शहरातील काम केले जाणार आहे. तसेच मुंबई महानगर प्रदेशातील काम एमएमआरडीएच्या माध्यमातून केला जाणार आहे.
मेट्रो 8 कॉरिडॉरमुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आगामी नवी मुंबई विमानतळ एकमेकांशी थेट जोडले जाणार आहेत. म्हणजेच राजधानी मुंबई मधील दोन्ही विमानतळे या मेट्रो मार्ग प्रकल्पामुळे जोडले जाणार असून यामुळे प्रवाशांचा या दोन्ही विमानतळदरम्यानचा प्रवास सोयीचा होणार आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, हा मार्ग 35 किलोमीटर लांबीचा राहणार आहे.
हे पण वाचा :- मुंबई – शिर्डी, आणि मुंबई – सोलापूर वंदे भारत ट्रेन बंद होणार ???
हा मेट्रो मार्ग अंशता भुयारी असेल. म्हणजे या मेट्रो मार्गाचा काही भाग भुयारी असेल आणि काही भाग उन्नत मार्ग असेल. काही मीडिया रिपोर्ट नुसार, या प्रकल्पासाठी अंदाजे 15 हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. निश्चितच हा मेट्रो मार्ग मुंबई आणि नवी मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी मोलाची भूमिका निभावणार आहे. या मार्गावर एकूण सात स्थानके असतील आणि या मेट्रो मार्ग प्रकल्पामुळे जवळपास नऊ लाख प्रवाशांना फायदा होईल असा दावा केला जात आहे.
म्हणजेच नऊ लाख प्रवासी रोजाना या मेट्रोमार्गावरून प्रवास करतील अशी आशा या निमित्ताने व्यक्त होत आहे. जसं की आपण आधी पाहिलं हा मेट्रो मार्ग प्रकल्प अंशता भुयारी राहणार आहे. यानुसार, घाटकोपर येथील अंधेरी आणि ईस्टर्न एक्सप्रेसवे दरम्यान हा मार्ग भूमिगत म्हणजे भुयारी असेल आणि घाटकोपर ते मानखुर्द लिंक रोडमार्गे मानखुर्दपर्यंत उन्नत मार्ग असणार आहे. निश्चितच 15000 कोटी रुपये खर्चून विकसित केला जाणारा हा मार्ग मुंबई आणि नवी मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने अति महत्त्वाचा असून यामुळे राजधानी मुंबईच्या वैभवात आणखीनच भर पडणार आहे.
हे पण वाचा :- नवी मुंबई, डोंबिवलीवासियांसाठी महत्वाची बातमी; ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग ‘या’ महिन्यात होणार खुला