Mumbai To Nagpur Railway : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रवासासाठी रेल्वे हे एक महत्त्वाचे साधन आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. दरम्यान राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास आता सुपरफास्ट होणार आहे. कारण की मुंबई ते नागपूर दरम्यान एकेरी विशेष एक्सप्रेस गाडी चालवली जाणार आहे.
यामुळे मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. खरे तर या मार्गावर चालवल्या जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते.
नेहमीच या मार्गावरील गाड्यांमध्ये गर्दी असते. दरम्यान याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मुंबई ते नागपूर अशी एकेरी विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे.
छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या दिवशी अर्थातच 19 फेब्रुवारीला ही विशेष एकेरी एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
कसे राहणार वेळा पत्रक
हाती आलेल्या माहितीनुसार, मुंबई ते नागपूर या दरम्यान मध्ये रेल्वे कडून एकेरी विशेष एक्सप्रेस गाडी चालवली जाणार आहे.
या गाडीच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर ही विशेष एकेरी एक्सप्रेस ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सोमवार, १९ फेब्रुवारी रोजी ००.२० वाजता सुटणार आहे आणि त्याच दिवशी ३.३२ वाजता नागपूर येथे पोहोचणार आहे.
या मुंबई-नागपूर अतिजलद वन वे विशेष गाडीमुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार विशेष एक्सप्रेस ट्रेन
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ही एकेरी विशेष एक्सप्रेस ट्रेन या रेल्वे मार्गावरील सर्वच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.
ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, वर्धा स्थानकावर थांबणार अशी माहिती मध्य रेल्वेच्या माध्यमातून समोर आली आहे.