Mumbai To Kalyan-Dombivali Travel : मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी तसेच हे जगातील सर्वाधिक महत्त्वाच शहर आहे. जगातील सर्वात कृष्ण शहरांमध्ये मुंबईचा देखील समावेश होतो. यामुळे या शहरातील वाहतूक व्यवस्था इतर विकसित शहरांप्रमाणेच केल्या जात आहेत. यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. शासनाकडून देखील मुंबई शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जात आहे.
दरम्यान आता मुंबई शहरातील रेल्वे मार्गावरील तसेच रस्ते मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी शहरात जलमार्ग तयार केले जात आहेत. मुंबईला लाभलेल्या समुद्रकिनाऱ्याचा वापर करून वेगवेगळे जल मार्ग विकसित होत आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जगातील अनेक विकसित शहरांमध्ये जलमार्गे आजही वाहतूक होत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जलमार्गे केल्याने रस्ते वाहतुकीवर तसेच रेल्वे वाहतुकीवर असलेला ताण कमी होणार आहे. यामुळे प्रदूषणाचा स्तर कमी होईल आणि लोकांना सुरक्षित आणि किफायतशीर प्रवास करता येणे शक्य होईल.
मुंबई शहर, उपनगरे, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, मीरा-भाईंदरला जलमार्गे जोडले जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने 1 हजार 16 कोटींहून अधिक रुपये खर्चाचा प्रकल्प आखला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वेगवान बोटी आणि आधुनिक जेटी उपलब्ध होणार आहेत. यामुळे मुंबई आणि उपनगरात वसलेल्या नागरिकांना जलद आणि आरामदायी प्रवास अनुभवता येणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, वसई-ठाणे-कल्याण या राष्ट्रीय जलमार्ग 53 या योजनेअंतर्गत जलवाहतुकीच्या पहिल्या टप्प्यात भाईंदर, कोलशेत, काल्हेर आणि डोंबिवली या चार ठिकाणी जलवाहतुकीसाठी जेटी व इतर प्रवासी सुविधा उभारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यासाठी 99 कोटी 67 लाख रुपये खर्च होतील. विशेष बाब अशी की, यासाठी निविदा देखील मागवण्यात आल्या आहेत. तसेच दुसऱया टप्प्यात ठाणे खाडीमध्ये वाशी, ऐरोली, ठाणे-मीठबंदर आणि मुलुंड या चार ठिकाणी जेटीचे बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; ‘हा’ बहुचर्चित मार्ग वाहतुकीसाठी खुला, पण…..
तसेच या भागातल्या खाडय़ांमधील खोली वाढवली जाणार आहे. यासाठी गाळ उपसला जाईल. या दुसऱ्या टप्प्यासाठी सुमारे 330 कोटी 79 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच याच्या तिसऱया टप्प्यात देखील महत्त्वाची कामे केली जाणार आहेत. यामध्ये ठाणे खाडी व वसई खाडी (उल्हास नदी) एकमेकांना जोडण्यासाठी ठाणे-मीठबंदर ते कशेळी हा जलमार्ग तयार होणार असल्याची माहिती जाणकार लोकांनी दिली आहे. यासाठी 424 कोटी रुपये खर्च होणार आहेत.
या प्रकल्पाची विशेष बाब अशी की, गेट वे ऑफ इंडिया व रेडिओ क्लबजवळ जलवाहतुकीसाठी जेटी व इतर सुविधांसाठी 162 कोटी 20 लाख रुपय खर्च होणार आहेत. यासाठी यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. तसेच या प्रकल्पासाठी सर्व परवानग्या देखील मिळाल्या आहेत. आता लवकरच या जेटीचे काम सुरू केले जाणार आहे. या जेटीमुळे दक्षिण मुंबई ते ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई ही शहरे परस्परांना थेट जलमार्गाने जोडले जाणार आहेत.
हे पण वाचा :- अवकाळी पाऊस केव्हा घेणार विश्रांती ! पंजाबराव डख यांनी दिली मोठी माहिती, पहा काय म्हटले Punjabrao?
निश्चितच, मुंबई शहराला यामुळे एक नवीन वैभव मिळणार आहे. मायानगरी आणि स्वप्न नगरी म्हणून विख्यात असलेल्या मुंबईच्या वैभवात यामुळे भर पडेल आणि मुंबई आणि उपनगरात वसलेल्या नागरिकांना देखील या सुविधेचा फायदा होईल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे. यामुळे मुंबई ते उपनगरातील प्रवास अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे.
खरं पाहता कुठल्याही विकसित राष्ट्रात, राज्यात, प्रदेशात, शहरात झालेल्या विकासात तेथील वाहतूक व्यवस्थेचा सर्वाधिक वाटा असतो, हेच कारण आहे की मुंबईमधील वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून शहरात जलमार्ग विकसित होत असून याचा आगामी काही वर्षात निश्चितच फायदा होणार आहे. यामुळे फक्त मुंबईकरांनाच फायदा होईल असं नाही तर मुंबईमध्ये येणाऱ्या पर्यटकांना देखील मोठा फायदा होणार आहे. तसेच राजधानीमधील पर्यटन व्यवसाय देखील यामुळे भरभराट घेईल असं मत जाणकार व्यक्त करत आहेत.