Mumbai To Goa Special Train : येत्या दहा दिवसात महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. दरवर्षी गणेशोत्सवाचा सण संपूर्ण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. कोकणात मात्र गणेशोत्सवाचा पर्व अधिक उत्साहात साजरा होतो.
दरवर्षी कामानिमित्त कोकणाबाहेर स्थायिक झालेले कोकणवासी गणेशोत्सवाच्या सणाला गावाकडे परततात. यामध्ये मुंबईहून कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांची संख्या सर्वाधिक राहते. यंदाही मुंबईहून गणेशोत्सवाला लाखोंच्या संख्येने कोकणवासी कोकणात जाणार आहेत.
अशा परिस्थितीत या भाविकांच्या प्रवासासाठी रेल्वेने काही विशेष गाड्या कोकण रेल्वे मार्गावर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यंदा कोकण रेल्वे मार्गावर मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान चाळीस विशेष फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.
मुंबई ते मडगाव दरम्यानच्या 40 विशेष फेऱ्या 13 सप्टेंबर 2023 ते 2 ऑक्टोबर 2023 दरम्यान चालवल्या जाणार आहेत. अशा परिस्थितीत आज आपण मुंबई ते मडगाव दरम्यान चालवल्या जाणाऱ्या या गणपती विशेष गाडीच्या वेळापत्रकाबाबत आणि थांब्यांबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक?
गणेशोत्सवाचा पार्श्वभूमीवर 13 सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत सीएसएमटी ते मडगाव अशी विशेष गाडी चालवली जाणार आहे. ही गाडी दररोज सीएसएमटी येथून रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी मडगाव कडे रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी मडगावला पोहोचणार आहे. तसेच ही गाडी मडगाव वरून रोज दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी मुंबईकडे रवाना होणार आहे.
कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार?
ही गणपती विशेष गाडी या रेल्वे मार्गावरील सर्वच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबवण्याचे नियोजन कोकण रेल्वेने आखले आहे. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार अशी माहिती रेल्वेच्या माध्यमातून समोर आली आहे.