Mumbai To Goa : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे मुंबई येथील वांद्रे टर्मिनस ते मडगाव दरम्यान नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे आधीच मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. मात्र या प्रस्तावाला अजूनही बोर्डाकडून मंजुरी मिळालेली नाहीये.
यामुळे वांद्रे ते मडगाव दरम्यान एक्सप्रेस ट्रेन सुरू होत नाहीये. मात्र आता याच वांद्रे मडगाव एक्सप्रेस ट्रेन संदर्भात नवीन अपडेट समोर आली आहे. खरेतर या मार्गावर सुरू असणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असते.
या मार्गावरील सर्वच गाड्या हाऊसफुल धावतात. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी या मार्गावर नवीन गाडी सुरू झाली पाहिजे अशी मागणी केली जात होती.
दरम्यान याच मागणीची दखल घेत अन येथील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पाठपुराव्यानुसार रेल्वेने वांद्रे टर्मिनस ते मडगाव दरम्यान नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
या गाडीचा प्रस्ताव रेल्वे बोर्ड आणि रेल्वेच्या इतर विभागांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. मात्र या प्रक्रियेला वेळ लागत असल्याने या गाडीचा उद्घाटन सोहळा लांबला आहे. ही गाडी आधी 24 ऑगस्टला सुरू होणार अशी माहिती समोर आली होती.
मात्र या गाडीचे उद्घाटन नियोजित वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. पण आता ही गाडी 29 ऑगस्ट 2024 पासून सुरु होणार अशी माहिती समोर आली आहे. ही ट्रेन आठवड्यातून दोन दिवस चालवली जाणार आहे.
म्हणजेच ही एक द्वि साप्ताहिक गाडी राहणार आहे. यामुळे मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान आता आपण या गाडीचे वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक
या गाडीचे उद्घाटन 29 ऑगस्टला होईल आणि त्या दिवसापासूनच ही गाडी सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे. ही गाडी मडगाव येथून मंगळवारी आणि गुरुवारी सकाळी सात वाजून 40 मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि वांद्रे टर्मिनस येथे 24:40 वाजता पोहोचणार आहे.
तसेच वांद्रे येथून दर बुधवारी आणि शुक्रवारी ही गाडी पहाटे सहा वाजून पन्नास मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि मडगाव येथे रात्री 22:00 वाजता पोहोचणार आहे.