Mumbai To Delhi Travel : भारतात सध्या बुलेट ट्रेनची मोठी चर्चा सुरू आहे. बुलेट ट्रेन चा कमाल वेग हा 360 किलोमीटर प्रति तास एवढा आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर चालवली जाणार आहे. सध्या या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच हा प्रकल्प पूर्ण होणार आहे.
बुलेट ट्रेन मुळे मुंबई ते अहमदाबाद यादरम्यान चा प्रवास जलद होणार आहे. मात्र बुलेट ट्रेन पेक्षा वेगवान प्रवास करता आला तर कसं राहील? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का. अगदीच चहा पिण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढ्या कालावधीत मुंबई ते दिल्लीचा प्रवास करता येणे शक्य आहे.
कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही मात्र जगात अशा काही तंत्रज्ञानाची चाचणी केली जात आहे ज्यामुळे या गोष्टी शक्य होणार आहेत. दिल्ली पासून चेन्नई किंवा मुंबईला अवघ्या 15 ते 30 मिनिटांच्या काळात पोहचता येणार आहे.
आता तुम्ही मला मुंबई ते दिल्ली फक्त पंधरा मिनिटात कसं शक्य आहे? कारण की विमान प्रवास केला तरी देखील मुंबई ते दिल्ली हा प्रवास पंधरा मिनिटात पूर्ण होऊ शकत नाही.
पण, मुंबई ते दिल्ली हा प्रवास पंधरा मिनिटात शक्य होऊ शकतो हायपरसॉनिक जेट विमानामुळे. हे असे विमान आहे जे 5700 किलोमीटर ताशी वेगाने धावण्यास सक्षम आहे.
जर हे हायपरसोनिक जेट खरंच सुरू झाले तर दिल्ली ते लंडन हा प्रवास अवघ्या एका तासात आणि दिल्ली ते न्यूयॉर्क असा प्रवास अवघ्या दोन तासात करता येणे शक्य होणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे या तंत्रज्ञानाचा शोध आधीच लागलेला आहे. आता फक्त या तंत्रज्ञानाची चाचणी सुरू आहे. व्हीनस एरोस्पेस या कंपनीने हे हायपर सोनिक जेट तयार केलेले आहे. हे विमान लंडन ते न्यूयॉर्क दरम्यान पहिल्यांदा उड्डाणं भरणार आहे.
हे आतापर्यंतचे सर्वात वेगवान विमान ठरणार आहे. व्हीनस एरोस्पेसने गेल्या वर्षी व्हीनस डिटोनेशन रॅमजेट इंजिनची चाचणी केली होती. व्यावसायिक आणि संरक्षण अशा दोन्ही क्षेत्रात हायपरसॉनिक प्रवासाची सुविधा देणे, हा या इंजिनच्या निर्मितीमागील उद्देश आहे.
एकंदरीत हे सायपरसोनिक जेट आगामी काळात उड्डाण भरताना दिसणार असून यामुळे हवाई वाहतुकीच्या क्षेत्रात एक नवीन क्रांती येणार आहे. मुंबई ते दिल्ली प्रवास फक्त पंधरा मिनिटात होणे हे स्वप्नवत आहे. मात्र जर हे जेट या मार्गावर चालवले गेले तर हे स्वप्न पूर्ण होऊ शकते.