Mumbai Thane Tunnel : देशभरात वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये वेगवेगळ्या मार्गावर मेट्रो सुरु केल्या जात आहेत. आता देशातील प्रमुख लोहमार्गावर वंदे भारत गाड्या देखील सुरू होत आहेत. याशिवाय बुलेट ट्रेन सुरू करण्याची नियोजन शासनाचे असून आता मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन बाबत एक मोठी माहिती हाती आली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन हा मोदी सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पा अंतर्गत ठाणे खाडीवर समुद्राखालून बोगदा तयार केला जाणार आहे. दरम्यान आता या बोगद्याच्या सिव्हिल कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या प्रकल्पांतर्गत तयार केला जाणारा 21 किलोमीटर लांबीचा बोगद्याचे काम आता प्रत्यक्षात सुरू होणार असून याची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
हे पण वाचा :- वंदे भारत एक्सप्रेसबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय; 12 एप्रिलला ‘या’ रूटवर सुरु होणार आणखी एक Vande Bharat Train, पहा…..
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा बोगदा या प्रकल्पाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. हा टनेल ठाणे खाडीवर असून सिंगल ट्यूबचा असेल आणि त्याला दुहेरी ट्रॅक असतील. 20.37 कि.मी.चा हा बोगदा राहणार आहे. असं सांगितलं जात आहे की हा बोगदा पूर्ण झाल्यास फक्त 8 मिनिटात मुंबईहून ठाणे गाठता येणार आहे.
बोगद्याच्या एकूण लांबीपैकी सात किलोमीटरचे अंतर हे समुद्राखालील राहणार आहे. या बोगद्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून बोगदा हा जमिनीपासून 24 मीटर खाली राहणार आहे. म्हणजेच समुद्राखालून तयार होणाऱ्या बोगद्यामध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन धावणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्प अंतर्गत आत्तापर्यंत महाराष्ट्रात 13.72% काम पूर्ण झाले आहे.
हे पण वाचा :- अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरसह 21 जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार ! आयएमडीचा अलर्ट
आतापर्यंत गुजरातमध्ये या प्रकल्पाचे 32.93% काम पूर्ण झाले आहे. वास्तविक हा प्रकल्प महाराष्ट्र गुजरात आणि दादरा नगर हवेली मध्ये विकसित होणार आहे. यात आपल्या राज्यात ठाणे खाडीत समुद्राखाली 13.1 मीटर व्यासाचा बोगदा विकसित केला जाणार असून याचे काम येत्या काही दिवसात आता प्रत्यक्ष सुरू होणार आहे.
हा बोगदा जमिनीखाली 25 ते 40 मीटर खोल राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बोगद्यासाठी जवळपास सहा हजार चारशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा बोगदा या प्रकल्पाचा सर्वात महत्त्वाचा भाग असून या प्रकल्पाचा पहिला टप्पा 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे.
हे पण वाचा :- पुणे, अमरावतीकरांसाठी खुशखबर ! प्रवाशांच्या सेवेसाठी मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, पहा…..