Mumbai Solapur Vande Bharat Train : मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेन चे 10 फेब्रुवारी रोजी उद्घाटन होणार आहे. ही ट्रेन पुणे मार्गे धावणार आहे. या ट्रेनचा दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याने या इव्हेंट कडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणार आहे. दरम्यान 10 फेब्रुवारी रोजी या वंदे भारत एक्सप्रेसच्या रूट मध्ये मात्र बदल केला जाणार आहे.
म्हणजे 10 फेब्रुवारी ही ट्रेन सोलापूर मध्ये दाखल होणार नाही. एका रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, उद्घाटनाच्या दिवशी ही ट्रेन फक्त पुण्यापर्यंतच धावणार आहे.10 फेब्रुवारीला सकाळी सहा वाजून पाच मिनिटाला पुण्याकडे रवाना होईल आणि पुण्यापर्यंतचाच प्रवास करेल. मात्र उद्घाटनानंतर ही ट्रेन मुंबई ते सोलापूर दरम्यान आपला प्रवास अविरतपणे सुरू ठेवेल.
दरम्यान या ट्रेनच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर सोलापूर येथून सकाळी 06:05 मिनिटांनी ही रेल्वे मुंबईकडे रवाना होईल आणि ट्रेन पुण्यामार्गे धावणार असून 9 वाजता पुणे येथे पोहचेल मग पुण्याच्या रेल्वे स्थानकावरून ही ट्रेन मुंबईच्या दिशेने धावेल मग दुपारी 12:35 वाजता सीएसएमटीला म्हणजे मुंबईला पोहोचणार असल्याचे सांगितले जात आहे.
तसेच मुंबईहून सोलापूरकडे धावताना ही ट्रेन सायंकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी मुंबईहून निघणार आहे. सी एस एम टी हून निघाल्यानंतर 7 वाजून 30 मिनिटांनी ही रेल्वे पुण्यात दाखल होईल अन मग रात्री दहा वाजून 40 मिनिटांनी ही रेल्वे सोलापूरला पोहचणार आहे. या ठिकाणी एक गोष्ट विशेष अशी की मुंबईहून बुधवारी आणि सोलापूरहून गुरुवारी ही रेल्वे धावणार नाही.