Mumbai Solapur Vande Bharat Train : मुंबई पुणे आणि सोलापूर या तीन महाराष्ट्रातील अति महत्त्वाच्या शहरांना वंदे भारत एक्सप्रेसमुळे उत्तम कनेक्टिव्हिटी मिळाली आहे. या ट्रेनमुळे सोलापूर वासियांचा पुणे आणि मुंबईकडचा प्रवास सोयीचा झाला आहे. तसेच मुंबई आणि पुणे या दोन शहरांदरम्यानचा प्रवास देखील गतिमान बनला आहे. मात्र आता या ट्रेन बाबत एक मोठी माहिती हाती आली आहे.
वास्तविक वंदे भारत एक्सप्रेस ही आपल्या स्पीड साठी ओळखले जाते. ही ट्रेन तब्बल 180 किलोमीटर प्रतितास एवढ्या वेगाने धावण्या सक्षम आहे. पण भारतीय रेल्वे बोर्डाकडून या ट्रेनला 130 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावण्यास मंजुरी देण्यात आले आहे. परंतु नुकतीच या वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक मोठी माहिती हाती आली आहे.
हे पण वाचा :- वंदे भारत एक्सप्रेस बाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची मोठी माहिती; म्हटले की, ऑगस्टमध्ये महाराष्ट्रात…..
या माहितीमधून ही ट्रेन 130 किलोमीटर प्रतितास या वेगाने देखील धावत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, ही ट्रेन ऍव्हरेज ट्रेनची किलोमीटर प्रति तास या वेगाने धावते. म्हणजे ही ट्रेन 100 किलोमीटर प्रतितास या वेगाने देखील धावत नाही.
मात्र रेल्वे अधिकाऱ्यांनी असे असले तरी ही गाडी शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेस च्या तुलनेत अधिक गतिमान असल्याचा दावा केला आहे. दरम्यान आज आपण मुंबई सोलापूर आणि मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस किती वेगात धावतात याबाबत जाणून घेणार आहोत.
हे पण वाचा :- म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीच्या पात्र अर्जाची यादी ‘या’ दिवशी निघणार ! पहा संपूर्ण वेळापत्रक
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर दरम्यान ही ट्रेन सहा तास 35 मिनिटात आपला प्रवास पूर्ण करते. या दोन्ही शहरांदरम्यानच 455 किलोमीटरचे अंतर ही ट्रेन जवळपास साडेसहा तासात पार करते. म्हणजेच ही गाडी अवरेज 71.65 किलोमीटर प्रति तास या वेगाने सध्या धावत आहे.
वास्तविक, ही ट्रेन ११० किलोमीटर प्रतितास ते १३० किलोमीटर प्रति तास या वेगाने धावेल असं सांगितलं जात होतं. मात्र प्रत्यक्षात ही गाडी 71.65 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावत असल्याने या ट्रेनमुळे खरंच प्रवाशांना फायदा होतो का? हा एक विश्लेषणात्मक विषय राहणार आहे.
याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी दरम्यान सुरू करण्यात आलेली वंदे भारत एक्सप्रेस ऍवरेज 65.96 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावत आहे. या दोन्ही शहरांदरम्यानच 343 किलोमीटरच अंतर ही गाडी 5 तास 20 मिनिटात पूर्ण करत आहे.
निश्चितच सध्या अपेक्षित वेगात वंदे भारत एक्सप्रेस चालत नाहीत मात्र येत्या काही दिवसात रुळांची बांधणी चांगली झाली, ट्रॅकचे अपग्रेडेशन पूर्ण झाले तर गतीत वाढ होऊ शकते असं मत व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला ‘या’ गावात थांबा मिळणार? पहा काय म्हणाले रेल्वे अधिकारी